पालम (प्रतिनिधी) परभणी येथे 10 डिसेंबर मंगळवार रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावर दगडफेक करून संविधानाची प्रतिकृती तोडफोड करण्याचा दुष्कृत्त केल्याच्या निषेधार्थ 11 डिसेंबर रोजी पालम बाजारपेठ बंदचे आवाहन निवेदनाद्वारे केले आहे. परभणी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास दगडफेक करत संविधान तोडण्याच्या प्रयत्न केला अशा अपप्रवृत्ती जनक वादग्रस्त विधान व दगडफेक कृत्य करत असणाऱ्या चा निषेध करत 11 डिसेंबर रोजी पालम बंदचे आवाहन चे निवेदन पोलीस निरीक्षक यांना समस्त आंबेडकर अनुयायी च्या वतीने देण्यात आले.पालम मध्ये रॅली काढून निषेध केला. आरोपी सोपान दतराव पवार रा मिर्झापूर ता परभणी याचेवर देश द्रोहचा गुन्हा दाखल करून फासीची शिक्षा करावी अशी मागणी करण्यात आली
Author: Lok Sanchar
परभणी,(प्रतिनिधी) : येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीचा एका माथेफिरुने मंगळवारी (दि.10) सायंकाळी अवमान करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असून जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जनतेला शांतता राखण्याची आवाहन केले आहे. या प्रकरणानंतर मोठ्या प्रमाणावर नागरीक जमा झाले. तसेच काहींनी रास्तारोको तर काहींनी नंदीग्राम एक्सप्रेस रोकुन निषेध व्यक्त केला . परंतु, सुज्ञ पदाधिकारी व नागरीकांनी व पोलिस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेवून या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून स्थिती तात्काळ नियंत्रणात आणली. पोलिसांनी त्या माथेफिरुची कसून चौकशी सुरु केली होती. त्या दरम्यान शहरात काहीशा अफवा पसरल्या. पाठोपाठ व्यापार्यांनी तात्काळ आपआपले व्यवहार बंद केले.…
पालम (प्रतिनिधी) बांगलादेशातील हिंदू बांधवांवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पालम सकल हिंदू समाजाच्या वतीने दि. १० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मूक मोर्चा पालम श्री हनुमान मंदिर येथून निघाला आसुन पालम तहसिलदार यांना निवेदन दिले. सकल हिंदू समाजांच्या वतीने हिंदू मोर्चा संदर्भात आवाहन करण्यात आले होते. इसवी सन १९४७ पर्यंत बांगलादेश हा भारताचा भाग होता. त्यामुळे तेथील हिंदू हे आपले मूळचे भारतीय आहेत तेव्हा त्यांच्यावर होणारा अत्याचार मुळे निषेधार्थ मोर्चा काढन्यात आला आहे. हनुमान मंदिर, शनिवार बाजार येथून मेन रोड ते तहसिल कार्यलय येथे जाऊन निवेदन देणात आले आहे. या वेळी पालम येथिल सकल…
परभणी (प्रतिनिधी) ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ २०२४ कार्यक्रम जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली दि.१० डिसेंबर २०२४ रोजी साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाला श्रीमती अनुराधा ढालकरी, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, धैर्यशिल जाधव, आयुक्त महानगरपालिका, परभणी, संदीप घोंसीकर उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, परभणी, श्रीमती आशा गरुड, शिक्षणाधिकारी (मा.) जिल्हा परिषद, परभणी, संदीप राजपुरे, तहसिलदार परभणी व इतर मान्यवर तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मा. जिल्हाधिकारी यांचे हस्ते दिपप्रज्वलन करुन सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मा. जिल्हाधिकारी साहेब व इतर मान्यवरांचा सत्कार अध्यक्ष, विविध माजी सैनिक संघटना यांचे वतीने करण्यात आला. त्यानंतर…
परभणी,(प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशातील हिंदु समाजावर जाणिवपूर्वक होणार्या अन्याय, अत्याचारासह हल्ल्यांच्या निषेधार्थ सकल हिंदु समाजाच्या वतीने आज मंगळवारी (दि.10) सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महिला व युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. शनिवार बाजारातील मैदानावरुन सकाळी 10 वाजता या मोर्चास प्रारंभ झाला नानलपेठ कॉर्नर, शिवाजी रोड, छत्रपती शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, नारायण चाळ, स्टेशन रोड मार्गे हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातील मैदानावर या मोर्च्यांचे सभेत रूपांतर झाले. या ठिकाणाहून एका शिष्टमंडळाद्वारे जिल्हा प्रशासनास सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. मागील महिन्यांपासून बांगला देशातील भिषण परिस्थितीचा तीव्र…
परभणी,(प्रतिनिधी) : तालुक्यातील संबर येथे सोमवारी (दि.9) पहाटे चारच्या सुमारास अवैध रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाल्याने उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने त्याठिकाणी कारवाई करत ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालयात आणून लावला आहे. या कारवाईमध्ये महसूल सेवक ज्ञानेश्वर बुलबुले, माणिक गिरी, हनुमान राऊत, आकाश मोरे, रामेश्वर कनले व वाहन चालक अशोक कुर्हे यांनी केली. रेतीचे उत्खनन करताना आढळून आलेला स्वराज कंपनीचा केणीसह ट्रॅक्टर उपविभागीय अधिकारी शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखालील गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रतिबंधक पथकाने जप्त करून तहसील कार्यालयांमध्ये लावला आहे, अशी माहिती नायब तहसीलदार विष्णु पकवाने यांनी दिली. (छाया- उत्तम बोरसुरीकर)
परभणी,(प्रतिनिधी) : शहरात भरदिवसा महाविद्यालयीन तरुणीची छेड काढणार्या त्या नराधमास कठोर शासन करावे, अशी मागणी शिवसेनेच्या महिला पदाधिकार्यांनी केली आहे. शिवसेना महिला पदाधिकारी यांनी सोमवारी (दि.09) पोलीस अधीक्षकांना एक निवेदन सादर केले. त्याद्वारे, शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर भरदिवसा महाविद्यालयीन तरुणीची छेड काढण्याचा प्रकार नुकताच सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. त्याबाबत संबंधीत तरुणीमार्फत नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी त्या आरोपीस अटकही केली आहे. असे अनेक प्रकार शहरात वारंवार घडतांना दिसत आहेत. परंतु सगळ्याच तरूणी भितीपोटी पोलीसांकडे तक्रार न करता सहन करीत आहेत. या घटनेची दखल घेत पोलिसांनी त्या आरोपीस अटक केली आहे ही बाब उल्लेखनीयच आहे. परंतु, तेवढ्यावरच न…
परभणी (प्रतिनिधी) शहरातील विद्यानगर भागातील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर येथे मार्गशीर्ष शुद्ध एकादशी गीता जयंतीनिमित्त दिनांक 11 डिसेंबर बुधवार रोजी सकाळी अकरा वाजता संपूर्ण 18 अध्याय श्रीमद् भगवद्गीता पठनाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा ह्या आयोजनाचे पाचवे वर्ष असून प्रतिवर्षी साजरा होणाऱ्या या उत्सवात शेकडो महिला पुरुष भाविकांची उपस्थिती असते. याही वर्षी जास्तीत जास्त भाविकांनी गीता जयंतीनिमित्त गीता पठणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आयोजन आयोजक प्रफुल्ल चामणीकर, सुहास बिडकर, अरुण कुमार पेडगावकर, शंकर आजेगावकर आदींनी केले आहे.
परभणी (प्रतिनिधी) परभणी रेल्वे स्थानक परिसरात सध्या अनेक गैरसोयींना प्रवाशांना सामना करावा लागत आहे आधीच बाहेर उभे असलेल्या ऑटोरिक्षा च्या विळख्यातून वाट काढत प्रवासी रेल्वे स्थानकात प्रवेश करतो तर त्याला मोकाट कुत्र्यांचा ही सामना करावा लागतो. परभणी रेल्वे स्थानिकात कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला असून ही कुत्री प्लॅटफॉर्मवर सर्रासपणे फिरत असतात. प्रसंगी ही कुत्री आपापसात भांडण करून उच्छाद मांडतात. तर कधी प्रवाशांवर सुद्धा हल्ले करत आहेत. हे कुत्रे प्लॅटफॉर्मवर बिनधास्तपणे इकडून तिकडे तिकडून इकडे फिरत असतात या कुत्र्यांचा बंद बंदोबद करण्यात यावा अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे ( छाया- उत्तम बोरसुरीकर)
तीन प्रकरणांमध्ये १२६ अर्जदारांना शासकीय नोकरीचा लाभ मुंबई, – महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) इतिहासात ३३ वर्षात प्रथमच लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतीत ५४२ सेवा विषयक प्रकरणांपैकी १३८ प्रकरणे निकाली काढण्यात आली. न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभिनव उपक्रम यशस्वी करण्यात आला. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण आणि मुंबई उच्च न्यायालय विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोक अदालतीसाठी तीन पॅनल आयोजित करण्यात आले होते. पॅनल प्रमुख म्हणून न्यायमूर्ती विनय जोशी, सेवानिवृत्त सदस्य (न्या) ए. पी. कुऱ्हेकर, आर. बी. मलिक यांनी काम पाहिले. नितिन गद्रे (नागपूर), विजयकुमार (औरंगाबाद), विजया चौहान, संदेश तडवी, आर. एम. कोलगे…

