परभणी ( प्रतिनिधी ) जगाला शांतीचा व मानवतेचा संदेश देणाऱ्या भगवान बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार गीत गायनाच्या माध्यमातून कलावंत करत असतो ही समाज प्रबोधनाची चळवळ आहे. अशा गीत गायन स्पर्धेचे आयोजन भावी पिढ्या घडवण्यासाठी आणि महापुरुषांचा आदर्श घेण्यासाठी केले पाहिजे. असे प्रतिपादन डॉ राहुल पाटील यांनी केले.
धम्म मैत्री संवाद अभियानाच्या वतीने धम्मक्रांती बुद्ध भीम गीत गायन स्पर्धा उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाली. या स्पर्धेचे उद्घाटन आ डॉ राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले उदघटकिय मनोगत करतांना ते बोलतं होते.
६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने धम्म मैत्री संवाद अभियानाच्या वतीने आयोजित बुद्ध भीम गीत गायन स्पर्धेत मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील कलावंत सहभागी झाले होते.
या प्रसंगी विचार मंचावर गायिका सुनीताताई कीर्तने ,सुरेश हिवराळे , कचरू दादा गोडबोले, राजू सोनवणे, गौतमदादा भराडे ,बिट्टूभाऊ दातार,प्रमोदभाऊ कुटे संजय आदोडे उपस्थीत होते. धम्मक्रांती बुद्ध भीम गीत गायन स्पर्धेत एकापेक्षा एक सुंदर गीतांचे सादरीकरण कलावंतांनी केले. स्पर्धेचे परीक्षक प्रेमानंद दादा बनसोडे व गायक विजय खानापुरे यांनी पारदर्शकपणे परीक्षक म्हणून काम पाहिले . स्पर्धेचे पहिले पारितोषिक रुपये सात हजार रुपये व सन्मानचिन्ह डॉ सिद्धार्थ भाऊ हत्तीअंबिरे यांच्या वतीने कव्वाल भीमराव दुधमल यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
द्वितीय पारितोषिक रुपये पाच हजार रुपये व सन्मानचिन्ह सुरेश हिवराळे सरांच्या वतीने गायिका संगीतामुळे यांना तर
तिसरे पारितोषिक रुपये तीन हजार व सन्मानचिन्ह युवा नेते गौतम भराडे यांच्या वतीने धीरज मुंडे यांना प्रदान करण्यात आले.
सायंकाळी या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके वितरण प्रसंगी
अध्यक्षस्थानी प्रो डॉ आनंद मनवर होते. या वेळी सुरेश हिवराळे , गौतम भरडे,गौतम मुंडे , प्रेमानंद दादा बनसोडे, विजय खानापुरे, प्रा शाहीर शिवाजी कांबळे, कचरूदादा गोडबोले, गायिका सुनीताताई कीर्तने, अमोल धाडवे, गयाबाई हजारे, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन निमंत्रक संजय बगाटे यांनी तर आभार शिवाजी कांबळे यांनी मानले. धम्म मैत्री संवाद अभियान परभणी चे एम एम बरे, शाहीर भगवान वाघमारे,संजय मुळे, सुधाकर श्रीखंडे, भूषण मोरे, आकाश खिल्लारे, समीर अतूल वैराट रोडे,संजीव अढागळे, भारतीताई राऊत,संजय घनसावंत, आदींनी परिश्रम घेतले.