परभणी ( प्रतिनिधी)क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धा 14 वर्षाखालील मुले/ मुली या स्पर्धेच्या उद्घाटन थाटात संपन्न झाले.
प्रसंगी जिल्हाधिकारी रघुनाथजी गावडे उद्घाटक म्हणून तर प्रमुख पाहुणे म्हणून शहर महानगरपालिकेचे आयुक्त धैर्यशील जाधव, डॉ प्रा. माधव शेजुळ, सचिव, परभणी जिल्हा कुस्ती असोसिएशन परभणी, अण्णा डिगोळे, संचालक, राजे संभाजी तालीम केंद्र, शरद कचरे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती कविता नावंदे यांची उपस्थिती होती.
या स्पर्धेकरिता राज्यातील जवळपास 200 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धा दिनांक 20 ऑक्टोंबर 2024 ते 21 ऑक्टोबर 2023 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, बॅडमिंटन हॉल, परभणी येथे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धा दोन दिवस चालणार असून पहिल्या दिवशी 14 वर्षाखालील मुले तर दुसऱ्या दिवशी 14 वर्षाखालील मुलींच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर स्पर्धेच्या आयोजनबाबत राज्यातुन आलेल्या प्रशिक्षक/ क्रीडा मार्गदर्शक यांनी आयोजनाबाबत समाधान व्यक्त करत भोजन आणि राहण्याची व्यवस्था उत्तम असल्याबाबत आपले मत व्यक्त केले आहे.
डिव्हिजन देशमुख लातूर कुस्ती प्रशिक्षक: परभणी या ठिकाणी राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा चांगल्या प्रकारे सुरू आहे. आयोजन व नियोजन भोजन व राहण्याची व्यवस्था उत्तम प्रकारची केल्याबद्दल डिव्हिजन देशमुख यांनी परभणी क्रीडा अधिकारी आणि कार्यालय त्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
या स्पर्धा यशस्वी करण्याकरिता कार्यालयातील नानकसिंग बस्सी, क्रीडा अधिकारी, संजय मुंढे, राज्य क्रीडा मार्गदर्शक, सुयश नाटकर, क्रीडा अधिकारी, रोहन औंढेकर, क्रीडा अधिकारी, कल्याण पोले, क्रीडा मार्गदर्शक, रमेश खुणे वरिष्ठ लिपीक, धीरज नाईकवाडे, योगेश आदमे आणि प्रकाश पंडित यांनी काम पाहिले. ( छाया- उत्तम बोरसुरीकर)