प्रथमच परभणीत महाराष्ट्रातील पहिली ड्रॅगन बोट राज्यस्तरीय अजिंक्य स्पर्धा संपन्न
परभणी( प्रतिनिधी) महाराष्ट्रामध्ये जलक्रीडेसाठी प्रचंड क्षमता आहे आणि ड्रॅगन बोर्ड सारख्या स्पर्धांमुळे तरुणांना एक नव व्यासपीठ मिळत आहे त्यामुळे ड्रॅगन बोर्ड सारख्या जलक्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे असे मत गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केले आहे.
ड्रॅगन बोट राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा परीक्षेच्या बक्षीस वितरण समारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते
व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे राज्य संघटनेचे सचिव दिनेश मुंडे कोषाध्यक्ष भागवत चाटे व संघटनेचे प्रभारी पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रीयन ड्रॅगन बोट अँड ट्रेडिशनल वॉटर स्पोर्ट्स असोसिएशन व परभणी जिल्हा ड्रॅगन बोट अँड ट्रॅडिशनल वॉटर स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या सीनियर राज्यस्तरीय ड्रॅगन बोट अजिंक्य स्पर्धेचे आयोजन परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्प या ठिकाणी करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये राज्यातील 15 जिल्हा संघाने भाग घेतला होता. सहा जून ते आठ जून दरम्यान तीन दिवस या स्पर्धा चालल्या. या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक हा परभणी जिल्ह्याला मिळाला असून दुसऱ्या क्रमांकावर लातूर तर तिसऱ्या क्रमांकावर बीड जिल्ह्याला समाधान मानावे लागले आहे.
मुळामध्ये ड्रॅगन बोट स्पर्धा ही केरळ राज्यांमध्ये खेळली जाते. पण या खेळाचा विस्तार हा आता देशभर झाला आहे. महाराष्ट्रामध्ये देखील मागील बऱ्याच वर्षापासून हा खेळ खेळला जात आहे. यावर्षी प्रथमच परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्प या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हा खेळ सर्वांसाठी कुतूहालाचा विषय ठरला आहे. त्यामुळे या स्पर्धा पाहण्यासाठी देखील मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित झाले होते.
महाराष्ट्रीयन ड्रॅगन बोट अँड ट्रॅडिशनल वॉटर स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष टॉम जोसेफ आणि सचिव दिनेश मुंडे यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. या स्पर्धेदरम्यान माधव मुंडे लक्ष्मण मुंडे तुकाराम डोळे विनोद गीते संदीप हांगे सचिन मुंडे सकाळी खोकले माणिक घरजाळे कैलास शेळके खुशाल नरवटे संदीप मुरकुटे बळीराम नागरगोजे निळकंठ मुंडे मनीषा मुंडे प्रतीक्षा घरजाळे यांनी काम पाहिले.