परभणी,(प्रतिनिधी) : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्ताने जिल्हा पोलिस दलातर्फे शनिवार 31 ऑक्टोंबर रोजी पाच किलो मीटर अंतराची मॅराथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत अश्वमेध मैदानावरुन या स्पर्धेस सकाळी 6 वाजता प्रारंभ होणार आहे. अश्वमेध कमाल, विद्यापीठ क्वार्टर्स, जूना रस्ता, सह्याद्री वसतीगृह, टी पॉइंट, रेशन संशोधन केंद्र, बी.टेक कॉलेज, फूड फायनान्स कॉलेज, लेडीज हॉस्टेल, आर्टीकल्चर कॉलेज, बायोमिक्स प्लांटींग, नर्सरी, राईट टर्न पॉइंट, लेफ्ट टर्न पॉइंट ते अश्वमेध कमानीपर्यंत या पाच किलो मीटर अंतराच्या मॅराथॉन स्पर्धेत नागरीकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे.


