परभणी,(प्रतिनिधी) : शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने सर्वतोपरि प्रयत्न केले पाहिजेत, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार डॉ. श्रीमती फौजिया खान यांनी व्यक्त केली.
पूर्णा तालुक्यातील फुलकळस येथील केंद्रीय प्राथमिक शाळेतील सीएसआर निधीतून उभारल्या गेलेल्या खूल्या व्यायाम शाळेच्या लोकार्पणानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी खासदार खान यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकरीता पादचारी पुलाची आवश्यकता आहे, हे स्पष्ट करतेवेळी त्या दिशेने आपण पाठपुरावा करु, अशी ग्वाही दिली. परंतु, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी सर्वतोपरि प्रयत्न केले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. दरम्यान, मुख्याध्यापक स्वामी यांनी या शाळेकरीता आवश्यक असणारी आयसीटी खोली व इतर सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी मागणी केली.
दरम्यान, या खूल्या व्यायाम शाळेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खेळामध्ये प्राविण्य दाखविण्याची संधी मिळेल, अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली.


