पंचनाम्यासाठी आठ पथके गठीत; पथकास सहकार्य करण्याचे आवाहन परभणी, (प्रतिनिधी) परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीच्या अवमानाच्या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या आंदोलनात अनेक व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. या अनुषंगाने आज व्यापारी महासंघाने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना निवेदन देवून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची विनंती केली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापाऱ्यांसमवेत बैठक पार पडली. जिल्हाधिकारी यांनी आंदोलनातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिली असल्याचे यावेळी सांगितले. दरम्यान, परभणी शहरात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आठ पथके गठीत केलेले असून सदर पथक व्यापारी व व्यवसायिक यांच्या नुकसानीचे सविस्तर पंचनामे करणार आहेत. पंचनाम्याची कार्यवाही आज सकाळी सुरू…
Author: Lok Sanchar
परभणी (प्रतिनिधी) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण आकृती पुतळ्या परिसरातील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याप्रकरणी दुकानात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले. मोठे नुकसान झाले ही घटना दुर्दैवी असून सर्वसामान्य व्यापारांचे नुकसानीचे पंचनामे ताबडतोब केले जातील व त्यासाठी प्रशासनावर दबाव आणून पाठपुरावा करण्यात येईल तसेच नुकसानीचे भरपाई मिळेपर्यंत हा पाठपुरावा चालूच राहील असे आश्वासन विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आज(दि 12) परभणी येथे व्यापारांना दिले विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आज गुरुवार दि.१२ रोजी परभणी येथे दाखल झाले. त्यांनी शहरातील उसळलेल्या दंगली दरम्यान नुकसानग्रस्त भागास भेट दिली. प्रथम त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर स्टेशन…
परभणी (प्रतिनिधी) मंगळवार दि. १० रोजी दुपारच्या सुमारास येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आले. त्याच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी परभणी बंदची हाक देण्यात आली. या दरम्यान आंदोलन करणारे एका गटाने शहरांमध्ये दगडफेक व जाळपोळी केली. यादरम्यान परभणीचे खा. संजय जाधव आणि खा. फौजिया खान यांनी आपली प्रतिकिया देताना वादग्रस्त वक्तव्य केले असल्याचा आरोप करीत त्यांच्या वक्त्याचे चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आ. सौ मेघना बोर्डीकर साकोरे यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली. येथील अतिथी हॉटेल येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी असलेल्या…
परभणी,(प्रतिनिधी) : बुधवार दि 11 रोजी शहरातील बाजारपेठेत दगडफेकीसह जाळपोळीच्या घटनां घडली. आंदोलकांनी दुकानाचे तसेच वाहनाचे नुकसान केले या. झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत व संबंधित व्यापार्यांना प्रशासनाने नुकसान भरपाई त्वरित अदा करावी, जोपर्यंत नुकसान भरपाई मिळणार नाही तसेच जिल्हा पोलिस अधिक्षक व जिल्हाधिकारी या दोघा वरिष्ठ अधिकार्यांची तातडीने बदली होणार नाही तोपर्यंत बाजारपेठ बेमुदत बंद राहतील, असा इशारा जिल्हा व्यापारी महासंघाने राज्य सरकारला दिला आहे. जिल्हा व्यापारी महासंघाची गुरुवारी (दि.12) सकाळी छत्रपती शिवाजी चौकात व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यास हजारो व्यापारी उपस्थित होते. या संतप्त व्यापार्यांनी 10 डिसेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीच्या काचेची तोडफोड…
परभणी ,(प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या समोरील संविधान प्रतिकृतीच्या स्थळावरील काचेच्या तोडफोडीची घटना निश्चितच दुर्देवी आहे. त्या घटनेतील आरोपींविरोधात कठोर भूमिका घ्यावी, त्याचबरोबर बुधवारी (दि.11) काहींनी व्यापारीपेठांमधून केलेल्या दगडफेकीसह जाळपोळीच्या घटनेत मोठा तडाखा बसलेल्या व्यापार्यांच्या नुकसानीचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत, तसेच तोडफोड व जाळपोळ करणार्या समाजकंटकांवर लवकरात लवकर ओळख पटवून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या आमदार सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केली. आमदार बोर्डीकर यांनी बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेतली. संपूर्ण घटनेची माहिती घेतली. आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वांनी शांतता आणि संयम राखावा, असे आवाहनही…
सेलूत गोशाळेच्या टिनशेड उभारणीच्या कामाचे भूमिपूजन परभणी,(प्रतिनिधी) : येथील श्री संत गोविंदबाबा दादुपंथी मठ गोशाळेच्या 32 एक्कर जागेवर आकर्षक असे पर्यटन केंद्र उभारूण, गोशाळेच्या विकासासाठी आपण विशेष प्रयत्न करू, अशी ग्वाही आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली. येथील दादूपंथी मठ गोशाळेत गोसेवा आयोगाच्या वतीने मंजुर करण्यात आलेल्या गोशाळेच्या टिनशेड उभारणीच्या कामाचे भूमीपूजन बुधवारी (दि.11) आमदार बोर्डीकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अॅड. दत्तराव कदम, डॉ. संजय रोडगे, माजी सभापती दिनकर वाघ, गोशाळेचे सदस्य सुरेंद्र तोष्णीवाल, जगन्नाथ पवार, अविनाश बिहाणी, सूर्यकांत जाधव, भाजपा महिला आघाडीच्या रूपालीताई ठाकूर, कपील फुलारी, अजय डासाळकर, कृष्णा काटे, अॅड. कृष्णा शेरे, अनुप गुप्ता, अशोक शेलार आदींची…
पालम (प्रतिनिधी) परभणीत शहरातील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती स्मारकासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीचे मंगळवार दि.10 रोजी संध्याकाळी आवमान केला आहे. त्या समाजकंटकास प्रत्यक्षदर्शनी भीमसैनिकांनी चोक देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे जिल्हा पोलीस प्रशासन पुढील तपास करीत असून याघडलेल्या प्रकरणाचे सपूर्ण जिल्ह्यामध्ये पडसाद उमटले असून ही घटना पालम शहरात व्यापाऱ्यांनी आपापले प्रतिष्ठान बंद केले असुन शहरातील संविधान प्रेमींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ एकत्र येऊन या घटनेच्या निषेधार्थ दिनांक ११ रोजी सकाळी ११ वाजता बुद्ध विहार शनिवार बाजार पासून येथे एकत्र जमून शांती मोर्चा फळारोड ते पालम पिंपळगाव चौकतुन तहसील कार्यालय मार्ग शांती मोर्चा काढून तहसील. कार्यालयात शांती मोर्चा धडकला यावेळी संविधान प्रेमी यांनी…
परभणी,(प्रतिनिधी) : येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील संविधानाच्या प्रतिकृतीचे एका इसमाने नुकसान केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून परभणी शहर व जिल्ह्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 163 लागू करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला देण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रघुनाथ गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. परभणी शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीचे एका इसमाने नुकसान केल्याने शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. त्यामुळे जिल्ह्यात कलम 37 (1) (3) प्रमाणे जमावबंदी आदेश लागू असूनही या आदेशास न जुमानता आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी नागरिक एकत्र जमा होत…
परभणी, (जिमाका) – परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची करण्यात आलेल्या अवमानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. कुणीही कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन करु नये व कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे त्यांनी सांगितले.
परभणी (प्रतिनिधी) काल मंगळवारी दि 10 दुपारच्या सुमारास भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना एका माथेफिरू ने केल्यानंतर आज बुधवार दि 11 रोजी आंबेडकरी समाजाच्या वतीने परभणी बंदचे आवाहन करण्यात आले होते. मात्र सकाळपासून शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला मात्र दुपारनंतर हिंसक वळण लागले. बुधवारी परभणीत बंद पुकारण्यात आला होता. मात्र सकाळी सुरू असलेले हे आंदोलन दुपारनंतर अचानक हिंसक झाले. जमावाच्या एका गटांनी अचानक दुकानावर वाहनांवर दगडफेक करत जाळपोळीचे प्रकार केले. शहरातील विसावा कॉर्नर येथे दुकानावर ठेवलेले पाईप व टायर्स या आंदोलकांनी जाळले. त्यानंतर त्या आंदोलकांनी दुकानांवर आपले लक्ष वेधत दुकानाच्या लावलेल्या पाट्या तोडण्यात तसेच दुकानावर दगडफेक करण्यास…

