Author: Lok Sanchar

सेलू  (प्रतिनिधी) येथील विनोद बोराडे मित्र मंडळाच्या वतीने सोमवार ( दि. १६ ) डिसेंबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजता शहरातील साई नाट्यगृहात प्रसिद्ध हास्य कवी अशोक नायगावकर ( मुंबई ) यांच्या ‘ मिश्किली ‘ या हास्य कवितांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दैनंदिन जीवनातील प्रसंगांना मिश्कीलपणे टिपून हास्यकल्लोळाची आनंदाभुती देणाऱ्या. जीवनातील ताणतणाव क्षणभरासाठी दूर करणाऱ्या हास्यकवी अशोक नायगावकर यांच्या ‘ मिश्किली ‘ या हास्य कवितांच्या कार्यक्रमास श्रोत्यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन संयोजक माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी केले आहे.

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानाचा अवमान सहन केला जाणार नाही, संविधान मानणार्‍यांनाच भारतात राहण्याचा अधिकार आहे. ज्यांना संविधान मान्य नसेल त्याने देश सोडावा. परभणीत घडलेल्या संपुर्ण घटनेची गुप्तचर विभागामार्फत कसून चौकशी करावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली. शनिवारी (दि.14) दुपारी परभणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले दाखल झाल्याबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर शासकीय विश्रामगृहावर आठवले यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, प्रभारी पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करीत आढावा घेतला. त्या नंतर पत्रकार परिषदेतून पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बाबूराव कदम, ब्रम्हानंद चव्हाण, दिलीप…

Read More

शेतकऱ्यांना अॅग्रिस्टॅक माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा जलदगतीने मिळणार लाभ परभणी, (परभणी) :- राज्यातील कृषि क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलदगतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरीता केंद्र शासनाची अॅग्रिस्टॅक (Agristack) (Digital Public Infrastructure for Agriculture) योजना राज्यात राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी दि. 16 डिसेंबर 2024 पासून परभणी जिल्हयातील प्रत्येक गावात सर्व शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) तयार करण्याकरीता मोहीम राबविण्यात येणार आहे. परभणी जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांनी सदर मोहिमेच्या दिवशी उपस्थित राहून आपला शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे. अॅग्रिस्टॅक योजनेची उद्दिष्टे — राज्यातील सर्व…

Read More

परभणी प्रतिनिधी – परभणी शहरातील प्रभाग क्र. २ अंतर्गत बरकत नगर,सेवक नगर, मेहराज नगर आदी ठिकाणी वीज कंपनीकडून दुर्लक्ष होत असल्यामुळेच  लोंबकळणाऱ्या तारा धोकादायक बनल्या आहेत.या संदर्भात वीज वितरण कंपनीला रईस दादा मित्र मंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. .या निवेदनात महावितरण मार्फत वारंवार दुर्लक्ष केले जात असल्याने झुकलेले, वाकलेले पोल किंवा खांब, लोंबकळणारे विजेचे तारा धोकादायक बनल्या आहेत. या गंभीर प्रकारामुळे जिवीतहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विजेचे तार कोसळून एखादा जनावर दगावणे किंवा खेळणारे लहान मुलांच्या जीवास धोका निर्माण होण्याची दाट भीती व्यक्त करण्यात येत असून मुद्दाम जनतेच्या जीवांशी खेळणाऱ्या आणि गाढ झोपेत असलेल्या महावितरण कंपनीस जागे करण्यासाठीच…

Read More

परभणी (प्रतिनिधी)दंगलीच्या नावाखाली निरपराध महिला विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेना अध्यक्ष दीपक केदार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे ऑल इंडिया पँथर सेना अध्यक्ष दीपक केदार यांनी परभणी शहरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळापरिसराची पाहणी करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. दंगलीच्या नावाखाली निरपराध महिला विद्यार्थ्यां वरील गुन्हे मागे घ्यावे, चौकशी न करता दाखल केलेले चुकीचे तिन्ही एफआर रद्द करावेत, संविधान प्रतिकृतीचा अवमान करणाऱ्या मास्टरमाईंडला अटक करा, मागासवर्गीय वस्तीमधील कोंबिंग ऑपरेशन थांबवावी, यासह विविध मागण्या केल्या आहेत. ( छाया संजय घनसावंत)

Read More

परभणी (प्रतिनिधी) शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळील भारतीय संविधान प्रतीकृतीची समाज कटंकाने तोडफोड करून विटंबना केल्याच्या निषेधार्थ आरोपीवर कडक कारवाई नार्को टेस्ट करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ हत्तीआंबेरे यांनी आज जिल्हाधिकारी तसेच पोलीस उपाधीक्षक यांच्याकडे केली आहे. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनामध्ये असं म्हटले आहे की दिनांक 11 रोजी पुकारण्यात आलेल्या बंदला अचानक हिंसक वळण लागले. या निषेध आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रकाराची चौकशी व निरपराध अटक केल्याची सुटका करावी, नुकसानग्रस्त व्यापाऱ्याचे योग्य पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी आज डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे (अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) यांच्या वतीने जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी रघुनाथ…

Read More

परभणी (प्रतिनिधी) शहरात आज सायंकाळी सामान्य रुग्णालयात एका इसमाचा मृत्यू झाल्याची अफवा पसरवण्यात आली आहे. अशा प्रकारची कोणतीही घटना घडली नसून, या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन परभणी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रघुनाथ गावडे यांनी नागरिकांना केले आहे.

Read More

परभणी(प्रतिनिधी) – आज शुक्रवारी शहरात सायंकाळी पाचच्या सुमारास बाजारपेठेत एक अफवा पसरली काल उसळलेल्या दंगलीमध्ये जखमी झालेली एक महिला मृत्यू पावलेचे अफवा बाजारात पसरली आहे तरी नागरिकांनी कोणत्याही अफवाला बळी न पडता आपापले व्यवहार सुरळीत चालू ठेवावेत व कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी केले आहे

Read More

सेलू (प्रतिनिधी)भारतीय शालेय खेळ महासंघाच्या वतीने 68 व्या बेसबॉल 14 वर्ष मुले / राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन छत्तीसगड बिलासपूर येथे दिनांक 19 ते 22 डिसेंबर 2024 दरम्यान करण्यात आले असून या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचा संघ सहभागी होणार आहे, महाराष्ट्र संघाचा नेतृत्व नूतन विद्यालयाचा विठ्ठल अजयकुमार बोरसे हा खेळाडू करणार आहे हा संघ नांदेड येथे झालेल्या राज्य बेसबॉल स्पर्धेतून निवडण्यात आली आहे. या संघाचे प्रशिक्षण शिबिर क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती येथे दिनांक 13 ते 17 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या खेळाडूला मार्गदर्शक प्रशांत नाईक, प्रशिक्षक संजय…

Read More

परभणी प्रतिनिधी- परभणी बंद काळाच्या दरम्यान वृत्तपत्र कार्यालयास पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे परभणी जिल्हा पत्रकार संघाने एका निवेदनाव्दारे केली आहे. परभणी येथे दि.११ डिसेंबर रोजी परभणी बंदचे आवाहन करण्यात आले होते. परंतू काही समाज कंटकांनी वृत्तपत्र कार्यालयासमोर येवून दमदाटी करत काही पत्रकारांना कार्यालय बंद करण्याचे सांगत धमकाविण्याचा प्रयत्न केला. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असणाऱ्या वृत्तपत्र व पत्रकारांना कामकाज करण्यापासून रोखण्यात आले होते. अशा घटना वांरवार होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून पत्रकारांना संरक्षणाची गरज आहे. बंद काळाच्या दरम्यान वृत्तपत्र कार्यालयास पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे परभणी जिल्हा पत्रकार संघाने एका निवेदनात केली आहे.या…

Read More