परभणी,(प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूकीच्या दरम्यान सोशल मिडीयामधून आक्षेपार्ह मजकुर, फोटो, व्हिडीओ वगैरे गोष्टी व्हायरल झाल्यास संबंधित व्यक्तीसह ग्रूप अॅडमीनला जबाबदार ठरविले जाईल, असा इशारा जिल्हा पोलिस दलाने दिला आहे.
पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या जनसंपर्क विभागाने निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मिडियासंबंधी काही सूचना जाहीर केल्या आहेत. त्यात कोणत्याही उमेदवाराशी संबंधित त्याचे वैयक्तिक, कौटूंबिक, सामाजिक स्तरावर अवहेलना होईल असे आक्षेपार्ह टिका टिप्पणी करणे, मजकुर, फोटो, व्हिडीओ करुन प्रसारित करणे, अथवा आलेल्या संदेशावर आपले आक्षेपार्ह मत प्रगट करणे व पुढे पाठविणे, मतदाराचे मत वळविण्यासाठी कोणत्याही धर्माच्या लोकांच्या धार्मिक, भाषिक तसेच जातीद्वेष पसरविणारे आक्षेपार्ह मजकुर, फोटो व्हिडीओ प्रसारित करणे, राष्ट्रीय एकात्मतेला बाधा होईल या प्रकारचे स्वतंत्र सोशल मिडीया ग्रुप तयार करुन त्यावर आक्षेपार्ह मजकुर किंवा आचारसंहितेचा भंग होईल, दोन गटात वाद होईल अशा आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास संबंधित व्यक्तीसह ग्रुप अॅडमीनला जबाबदार ठरविले जाईल व त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिस दलाने दिला आहे.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


