पालम (प्रतिनिधी) पालम तालुक्यात परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या hii पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाची तोडफोड राष्ट्रद्रोही व्यक्तीकडून करण्यात आलेली होती. त्या घटनेच्या निषेदाच्या दिवशी संविधान प्रेमी यांनी परभणी शहरासह परभणी जिल्हा कडकडीत बंद होता परंतु दुपारनंतर परभणी शहरामध्ये काही ठिकाणी जाळ पोळ घटना झालेली होती त्या घटने संदर्भात पोलिसांनी धरपकड करण्यामध्ये पोलीस कडून मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज गल्लो गल्ली काम्बो ऑपरेशन करत अटक करत पोलीस यांनी हातात कायदा घेतल्यामुळे 300 ते 400 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.अटक केलेल्या निरअपराध व्यक्तींना कायद्याचा व खाकीचा हिसका दाखवण्यात मृत्युमुखी पडलेला भीमसैनिक सूर्यवंशी हा न्यायालीन कोठडीमध्ये कायद्याचा अभ्यास करणारा मृत्यु झाल्यामुळे संबंधित कुटुंबाला 25…
Author: Lok Sanchar
परभणी, (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य (सचिव दर्जा) ॲड. धर्मपाल मेश्राम हे दि. 17 आणि 18 डिसेंबर 2024 रोजी दोन दिवसीय परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे. मंगळवार दि. 17 रोजी दुपारी 4.00 वाजता परभणी येथे आगमन व मुक्काम. बुधवार दि. 18 रोजी सकाळी 10.00 वाजता जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, समाजकल्याण सहायक आयुक्त यांचेसोबत घटनास्थळी भेट. दुपारी 12.00 वाजता जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि समाजकल्याण सहायक आयुक्त यांचे सोबत सर्किट हाऊस येथे बैठक. दुपारी 1 ते 2 पर्यंत राखीव. दुपारी 2.00 वाजता परभणी येथून शासकीय वाहनाने नागपूरकडे ते प्रयाण करतील. *-*-*-*-*
परभणी (प्रतिनिधी) येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याच्या घटनेनंतर शहरात झालेल्या तोंडफोडी च्या पार्श्वभूमीवर अटक करण्यात आलेल्या काही लोकांपैकी शंकरनगर भागातील सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या 35 वर्षीय युवकाचा रविवारी न्यायालयीन कोठडीत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर आज दिनांक 16 रोजी पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंदला परभणी शहरात कडकडीत प्रतिसाद पाहावयास मिळत आहे. शहरात सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठान बंद ठेवली आहे. तसेच प्रशासनाच्या वतीने सुद्धा चौक बंदोबस्त करण्यात आला आहे . पोलीस प्रशासनाच्या वतीने जागोजागी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तर पोलिसांचे काही फिरते पथक शहरात गस्त घालत आहेत. शहरात तणावपूर्ण शांतता असून प्रशासन…
बीड, परभणीच्या घटना गंभीर; सरकारची सविस्तर चर्चेची तयारी नागपूर,- बीड, परभणी येथील घडलेल्या दोन्ही घटना गंभीर आहेत. या घटनासंदर्भात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी असून संविधानचा अपमान सहन केला जाणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेबांच्या संविधानानुसार अपेक्षित चर्चा सभागृहात झाली पाहिजे. संविधानाचा अपमान करणारा व्यक्ती मनोरुग्ण होता. विरोधी पक्षाने राजकारण न करता अशा घटना घडू नयेत यासाठी चांगल्या सूचना मांडाव्यात अशी अपेक्षा देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्थगन प्रस्ताव दरम्यान सविस्तर चर्चा…
परभणी (प्रतिनिधी) जुन्या पिढीतील तथा परभणी जिल्ह्यातील पहिल्या महिला डॉक्टर श्रीमती सुनंदा लक्ष्मीनारायण मंत्री यांच रविवारी रात्री वसमत रस्त्यावरील मंत्री कॉम्प्लेक्स मधील निवासस्थानी वृद्धापकाळामुळे निधन झाले. मृत्यूसमयी त्या 96 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून,जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे. येथील पद्मराज एनर्जी इंडिया लिमिटेड प्रकल्पाचे संचालक संजय मंत्री यांच्या त्या मातोश्री होत. दैनिक लोकसंचार परिवारातर्फे भावपुर्ण श्रद्धांजली.
पालम (प्रतिनिधी) हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूरमध्ये दि 15 रोजी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोहळा मोठया थाटात पार पडला यात जिंतूर विधानसभा मतदार संघाच्या आमदार सौ.मेघना बोर्डीकर साकोरे यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेताचा पालम भारतीय जनता पार्टी तालुक्याच्या वतीने छत्रपती शिवाजी चौक येथे फटाके वाजून आनंद उत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य, लक्ष्मणराव रोकडे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य, लिंबाजीराव टोले, प्रल्हादराव कराळे, भास्करराव कराळे, सुरेश पळसकर, रंगनाथ कल्याणकर, भाजपा तालुका उपाध्यक्ष,केशवराव शिरसकर, तालुका उपाध्यक्ष,सुरेश आप्पा,अमोल सुपेकर,योगीराज शिंदे,वाघमारे, बसवेश्वर लिंगायत, सोशल मीडिया शहराध्यक्ष रामजी गावंडे,अविनाश जोशी, मधुकर रोकडे उपस्थित होते
तडजोड पात्र १८७ प्रकरणे काढली निकाली पालम (प्रतिनिधी ) राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दि.१४ डिसेंबर रोजी पालम येथे विविध तडजोड पात्र प्रकरणे निकाली काढण्यात आली. या प्रकरणामधून ५८ लाख ५३ हजार २०० रुपये इतकी वसुली झाली झाली आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी यांच्या मार्गदर्शना नुसान आणि तालुका विधीसेवा प्राधिकरण पालम,दिवाणी न्यायालया क.स्तर व वकिल संघ पालम यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१४ रोजी राष्ट्रीय लोक अदालत पार पडली. या अदालतीमध्ये दिवाणी विभागाची पाच, फौजदारी विभागातील २९ आणि बँकेचे वादपूर्व १५३ असे एकूण १८७ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. लोक अदालत यशस्वी करण्याकरीता पालम न्यायालयाचे पॅनल प्रमुख प्रभारी दिवाणी न्यायाधिश एन.एम.रेड्डी,अँड टि.एम.पौळ,वकिल संघाचे…
परभणी (प्रतिनिधी) शहरातील शिवाजीनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र मध्ये दत्त जयंती साजरी यावेळी विविध कार्यक्रम पालखी विविध अध्यात्मिक कार्यक्रम सजीव देखावे सादर करण्यात आले.
पालम (प्रतिनिधी) तालुक्यातील रामपूर तांडा येथील महिला सरपंच यांनी पदाचा दुरुपयोग करून ग्रामपंचायतचा शासकीय निधीचा अपहार करून वसूलपात्र रक्कम नोटीस देऊनसुद्धा भरणा केली नाही. त्यामुळे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुरुवारी महिला सरपंचावर पालम पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाआहे. यामध्ये चार लाख १३ हजार १६३ रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार केल्याचे नमूद केले आहे. पालम पंचायत समितीचे – गटविकास अधिकारी उदयसिंह शिसोदे यांनी पालम ठाण्यात गुरुवारी फिर्याद दिली. हा प्रकार २० ऑक्टोबर २०२१ ते ८ सप्टेंबर २०२३ दरम्यान तालुक्यातील मौजे रामापूर तांडा ग्रामपंचायतच्या निधीबाबत घडला आहे. सरपंच म्हणून सुबाबाई थावरू राठोड यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून ग्राम पंचायतचा शासकीय निधीचा अपहार करूनसदरील…
पालम (प्रतिनिधी) येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील घडलेल्या हत्याकांडासह परभणी येथील घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी दि.१३ तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची करण्यात आलेल्या हत्येचा तपास सीआयडीमार्फत करत हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवत आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी यासह परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारका जवळील संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान करणाऱ्या आरोपीची सखोल चौकशी करून या पाठीमागे कुठली राजकीय शक्ती आहे का ? याचा सखोल तपास करावा या मागणीसाठी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर वसंतराव सिरस्कर,गटनेते भास्करराव सिरस्कर, प्रकाशराव कोकाटे, भैय्यासाहेब…

