डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन व ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
परभणी ( प्रतिनिधी)पूर्णा तालुक्यातील कोल्हेवाडी ग्रामस्थांचा रस्ता दुरुस्तीसाठी विधानसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयाचे गुरुवार 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 30 वाजेच्या सुमारास डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
पूर्णा तालुक्यातील कानडखेड ग्राम पंचायतीतील कोल्हेवाडी येथील पायाभूत सुविधा विशेषतः रस्त्यासाठी मागील अडीच ते 3 महिने आंदोलने आणि पाठपुरावा करून सुद्धा कोल्हेवाडी येथील रस्ता तयार करण्यात न आल्याने कोल्हेवाडीचे गांवकरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन देण्यात आले.
या बहिष्काराला डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया संघटनाने पाठिंबा दिला आहे. निवेदनावर गजानन नरहरी पवार , केरबा पवार , चंद्रकांत पवार ,वामन निवृत्ती , हनुमान पवार , ओंकार , नसिर शेख , जय महानंद एंगडे ,
आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.