Author: Lok Sanchar

परभणी ( प्रतिनिधी) धन्वंतरी जयंती व आयुर्वेद दिनानिमित्त एल आर फार्मास्युटिकल्स परभणी द्वारे आयोजित “ सर्वांसाठी आयुर्वेद” या विषयावरील एक दिवसीय चर्चासत्र एल आर फार्मास्युटिकल्सच्या श्री मुकुंद कुलकर्णी सभागृहात दिनांक 26/10/2004 रोजी पार पडले. आजच्या या धकाधकीच्या जीवनात अनेक प्रकारचे ताण तणाव वाढत आहेत अशावेळी संपूर्ण सुरक्षित औषधींचा वापर मानव आरोग्या करिता अत्यंत उपयुक्त ठरत आहे. आपला भारत देश हा आयुर्वेदाचा जनक आहे याचे महत्त्व आता संपूर्ण जगाला समजले आहे असे विचार मानव आयुर्वेदावर मार्गदर्शन करीत असताना डॉ. कुणाल कौसडीकर यांनी मांडले. आयुर्वेदामध्ये औषधी वनस्पतींचा वापर होतो परंतु या वनस्पतींवरच येणारे आजार, रोग किंवा असे रोग येऊच नयेत म्हणून प्राचीन…

Read More

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अनिल आहीरे यांनी परभणी विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.. परभणी (प्रतिनिधी) परभणी विधानसभा मतदारसंघासाठी परिवर्तन महाशक्ती प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. अनिल हरिश्चंद्र आहिरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सामान्य कुटुंबातील उमेदवाराला उमेदवारी देऊन परिवर्तन महाशक्ती चा घटक पक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, उपजिल्हा प्रमुख रामेश्वर जाधव, तालुका प्रमुख उद्धव गरुड, शहर प्रमुख अंकुश गिरी, शहर चिटणीस वैभव संघई,माऊली गरुड, माणिक गरुड, सुधीर देशमुख, शेख राजू, धाराबा कांबळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : परभणी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे तसेच उबाटा चे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान आ. डॉ. राहुल पाटील यांनी मंगळवारी (दि29) मोठे शक्तिप्रदर्शन करीत परभणीत उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची रॅली तील उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधले. आ. डॉ. राहुल पाटील यांनी अर्ज भरण्या पूर्वी मोठया रॅली चे आयोजन केले होते.शनिवार बाजारापासून दुपारी 12 वाजता महाविकास आघाडीच्या या संयुक्त रॅलीस प्रारंभ झाला. नानलपेठ कॉर्नर, शिवाजी रोड, छत्रपती शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, अष्टभूजा चौक, आर.आर. टॉवर, नारायण चाळ चौक मार्गे रॅलीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराकडे प्रस्थान केले. या रॅलीत मोठ्या वाहनावर युवा…

Read More

परभणी, (प्रतिनिधी) :- निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती के. हरिता, निवडणूक निरीक्षक (सामान्य) संचिता बिष्णोई आणि निवडणूक निरीक्षक (पोलीस) राजेश दुग्गल यांनी आज परभणी जिल्ह्यातील जिंतूर, परभणी, गंगाखेड व पाथरी विधानसभा मतदारसंघांतील निवडणूक विषयक बाबी व कायदा सुव्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. भारत निवडणूक आयोगाने जिंतूर व परभणी या दोन विधानसभा मतदारसंघांकरीता श्रीमती के. हरीता तर गंगाखेड व पाथरी या दोन विधानसभा मतदारसंघांकरीता़ संचिता बिष्णोई आणि निवडणूक निरीक्षक (पोलीस) म्हणून राजेश दुग्गल यांची नियुक्ती केली आहे. आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील चारही मतदारसंघांचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य…

Read More

‘स्वरमयी दिवाळी पहाट’ चे सलग तिसऱ्या वर्षी यशस्वी आयोजन परभणी ( प्रतिनिधी)अनिकेत सराफ आणि लायन्स क्लब परभणी मेन यांनी एकत्र येऊन यावर्षी ‘स्वरमयी दिवाळी पहाट’ चे  दिवाळी पाडावा शनिवार 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.30 वाजता आयोजन करण्यात आले आहे.  यावर्षीच्या संगीत सभेत, सुविख्यात गायक प्रथमेश लघाटे याला आमंत्रित केले आहे. विशेष म्हणजे, लिटील चॅम्प म्हणून रसिकमनावर अधिराज्य गाजवलेले प्रथमेश हा परभणीत पहिल्यांदाच गायन करणार आहे. त्याच्या सोबत परभणीची सुपुत्री, कवि शाम यांची कन्या तर विदुषी मंजुषा पाटील कुलकर्णी यांची शिष्या रसिका पैठणकर असणार आहे उत्सवांची नगरी असा परिचय असणाऱ्या परभणी शहरात दिवाळी निमित्त काही आयोजन व्हावे आणि स्थानिकांसह, सणा निमित्त…

Read More

परभणी ( वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात असलेल्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यासाठी पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्यात आली.  या प्रसंगी विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये दीपावली निमित्त ग्रीटिंग कार्ड बनवले. पूर्वीच्या काळी दिवाळीनिमित्त लहान मुले मातीचे किल्ले तयार करण्यात रममाण होत असत. परंतू सध्याच्या धकाधकीच्या जीवनात त्यांना अशा संधी मिळत नसल्याने, महाराष्ट्रातील परंपरा पुढील पिढयांपर्यंत पोहचवण्यासाठी शाळेमध्ये अप्रतिम अशी किल्याची सजावट करण्यात येऊन त्याबददल बालकांना माहिती देण्यात आली. तसेच पुर्वी दिपावलीनिमित्त  मुले घरकूल तयार करुन त्यात  खेळभांडी मांडून खेळत असत.  त्याप्रमाणे अशा खेळण्याचा आनंद बालकांना मिळावा या उददेशाने त्यांचे बाहूली घर  सजवण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य…

Read More

परभणी, ( प्रतिनिधी) आज सोमवार, दि 28 ऑक्टोबर 2024 रोजी वितरण केलेले नामनिर्देशन पत्र व उमेदवारांनी दाखल केलेले नामनिर्देशन पत्राची माहिती मतदारसंघनिहाय पुढीलप्रमाणे- 95- जिंतूर विधानसभा मतदारसंघ – 10 उमेदवारांनी 19 अर्ज घेतले. तर समीरराव गणेशराव दुधगावकर (अपक्ष), प्रेक्षा विजय भांबळे (अपक्ष), डॉ. प्रभाकर रंगराव बुधवंत यांनी अपक्ष व राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने प्रत्येकी एक, शेख सलीम शेख इब्राहीम (ऑल इंडिया मजलीस ई इन्कनाब ई मिलत), मेघना दिपक साकोरे बोर्डीकर (भाजप), राजीव किसनराव पंचागे (अपक्ष), मुंजाजी साहेबराव कदम (अपक्ष), अंकुश सिताराम राठोड (अपक्ष), प्रसाद ज्ञानेश्वर काष्टे (अपक्ष), गणेश जगन्नाथ काजळे (अपक्ष), सुरेश कुंडलीकराव नागरे यांनी अपक्ष व वंचित बहुजन आघाडीच्यावतीने प्रत्येकी…

Read More

जिंतूर,(प्रतिनिधी) जोरदार शक्तीप्रदर्शन करीत जिंतूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार सौ. मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सोमवारी (दि.28) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीतील भारतीय जनता पार्टी, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांसह अन्य हजारो कार्यकर्त्यांसह आमदार सौ. साकोरे-बोर्डीकर यांनी जिंतूरातून सकाळी रॅली काढली. या रॅलीत माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, माजी आमदार हरिभाऊ लहाणे यांच्यासह गंगाधर बोर्डीकर व अन्य नेते उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित सभेत सौ. मेघना साकोरे यांनी जिंतूर व सेलू या विधानसभा मतदारसंघात पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीनेही प्रयत्न केले आहेत. गेल्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत विकासाचा आणि नागरीकांच्या उन्नतीचा अजेंडा आपण सातत्याने…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : परभणी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत तथा शिवसेनाचे उमेदवार आनंद भरोसे यांनी सोमवारी (दि.28) रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनामहायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून भरोसे यांनी रविवारी मध्यरात्री परभणीत दाखल होताच सोमवारी सकाळी मोठ्या रॅली च्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केला. येथील शनिवार बाजारातून सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास रॅलीस प्रारंभ झाला. यावेळी एका उघड्या जीपवर भरोसे यांच्यासह शिवसेनेचे नेते माजी खा.सुरेश जाधव, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव शिंदे,नेते प्रविण देशमुख, महानगरप्रमुख नितेश देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष भास्करराव लंगोटे, केशवराव कदम, माजी जिल्हाध्यक्ष राजू कापसे, महिला आघाडीच्या गीता सूर्यवंशी, माजी नगरसेवक शिवाजीराव भरोसे, कृष्णा भरोसे, राजू शिंदे,पंजाबराव देशमुख,सुरेश काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शंकरराव भागवत,भारतीय…

Read More

परभणी (प्रतिनिधी) महाविकास आघाडी तसेच शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे परभणी विधानसभेचे आ. डॉ.राहुल पाटील हे मंगळवारी ( दि.29)राजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी यूवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची उपस्थितीत राहणार आहे. शहरातील शनिवार बाजार मैदान येथून सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली चे आयोजन करण्यात आले आहे. अर्ज दाखल प्रसंगी खा. संजय जाधव, खा. फौजीया खान, आ. सुरेश वरपूडकर, माजी आ. विजय गव्हाणे यांच्यासह घटक पक्षातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.आ. डॉ. राहुल पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली. मंगळवारी सकाळी ११ वाजता शनिवार बाजार येथून रँली निघणार आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे रॅलीत सहभागी…

Read More