परभणी,(प्रतिनिधी) : परभणी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे तसेच उबाटा चे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान आ. डॉ. राहुल पाटील यांनी मंगळवारी (दि29) मोठे शक्तिप्रदर्शन करीत परभणीत उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची रॅली तील उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधले.
आ. डॉ. राहुल पाटील यांनी अर्ज भरण्या पूर्वी मोठया रॅली चे आयोजन केले होते.शनिवार बाजारापासून दुपारी 12 वाजता महाविकास आघाडीच्या या संयुक्त रॅलीस प्रारंभ झाला. नानलपेठ कॉर्नर, शिवाजी रोड, छत्रपती शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, अष्टभूजा चौक, आर.आर. टॉवर, नारायण चाळ चौक मार्गे रॅलीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराकडे प्रस्थान केले. या रॅलीत मोठ्या वाहनावर युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, खा.संजय जाधव, खा. श्रीमती फौजिया खान, आ. डॉ. राहुल पाटील, लक्ष्मणराव वडले, माजी आमदार अॅड.विजय गव्हाणे, सहसंपर्क प्रमुख डॉ. विवेक नावंदर, माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे,संतोष बोबडे काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष नदीन इनामदार तसेच मारोतराव बनसोडे आदी विराजमान होेते.
भगवे झेंडे, निळे झेंडे, गळ्यामधून भगवे रुमाल, निळे रुमाल घालून कार्यकर्ते महाविकास आघाडीचा जयघोष करीत मोठ्या उल्हासात होते. या रॅलीचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात समारोप झाला. या ठिकाणी आयोजित केलेल्या सभेत खा. संजय जाधव, खा. फौजिया खान, माजी आ.विजय गव्हाणे, शिवसेनेचे उपनेते लक्ष्मणराव वडले, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस इरफान ऊर रहेमान खान, सुशिलभैय्या देशमुख, विकास लंगोटे, अनिल डहाळे, माजी नगरसेवक नवनीत पाचपोर, माजी नगराध्यक्षा श्रीमती जयश्री खोबे, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख डॉ. विवेक नावंदर, सौ. अंबीका डहाळे, माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे यांची जोरदार भाषणे झाली.
यावेळी बोलताना खासदार डॉ.फौजिया खान यांनी सांगितले,सध्या कायद्याचे राज्य नाही,गुंडाचे राज्य आहे.दिवसाढवळ्या हत्या होत आहेत.मंत्रालयात केवळ कंत्राटदार दिसत आहेत.देवेंद्र फडणविस हे केवळ पक्ष फोडाफोडी करण्यात मग्ण आहेत.आता सरकार बदलण्याची वेळ आली आहे.असे सांगितले.
आमदार डॉ. राहुल पाटील म्हणाले की माझ्या समोर जो उमेदवार दिला त्यांची माझ्यासमोर उभी राहण्याची लायकी नाही,जनतेची सेवा करावी लागते,नुसत सोशल मिडियावर गप्पा जमत नाही, जनता राहुल पाटलांच्या कुटूंबातील आहेत.तुमच्या सारख पैसे देऊन आणलेली जनता नाही,कोणीही किती अटापिटा केला तरी परभणीची जनता त्यांना जागा दाखवणार आहे. अशा शब्दात टिका केली. या मतदारसंघात आपण तीसर्यांदा उभे आहोत, हॅट्रीक करण्याची संधी द्यावी या मतदारसंघाच्या विकासाकरीता आपण निश्चितपणे कटीबध्द राहु, कोणाच्याही विश्वासस तडा जावू देणार नाही, विकासातसुध्दा सातत्याने अग्रेसर राहु, प्रश्न सोडवू, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.