परभणी, (प्रतिनिधी) माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त राष्ट्रीय संकल्प दिन तसेच लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण, संतोषी देवकूळे, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर, नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर यांच्यासह उपस्थित अधिकारी –कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकता दिनाची शपथ घेतली. *-*-*-*
Author: Lok Sanchar
परभणी (प्रतिनिधी) येथील शांतिदूत सेवाभावी संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे दीपावली निमित्त अनाथाश्रमात राहणाऱ्या अनाथ मुलांना मिठाई व फराळाचे वाटप महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके यांच्या हस्ते करण्यात आले. शांतिदुतच्या जनता मार्केट रोड वर असलेल्या कार्यलयात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुभाषचंद्र सारडा हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य बाळासाहेब जाधव, डॉ. दिनेश भुतडा, प्राचार्य सुरेश नाईकवाडे, सौ .वर्षा सारडा,रफिक भाई हे उपस्थित होते. मागील 30 वर्षापासून दरवर्षी दिपावलीनिमित्त मिठाई व फराळ वाटपाचा कार्यक्रम शांतिदुतच्या वतीने राबविण्यात येतो . त्या नुसार परभणी शहरातील विविध अनाथ आश्रमात राहणाऱ्या मुलांना मिठाई व फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना महिला व बालविकास…
जिंतूर ( प्रतिनिधी)जिंतूर विधानसभा मतदारसंघाकरीता 41 उमेदवारांनी 50 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 41 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची नावेपुढील प्रमाणे आहेत. अनिल बन्सी चव्हाण (बहुजन समाज पार्टी), बोर्डीकर मेघना दिपक साकोरे (भाजप), भांबळे विजय माणिकराव (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार), कृष्णा त्रिंबकराव पवार (ऑल इंडिया हिंदुस्तान काँग्रेस पार्टी), दिनकर धारोजी गायकवाड (राईट टू रिकॉल पार्टी), नागरे सुरेश कुंडलीकराव (वंचित बहुजन आघाडी), डॉ. प्रभाकर बुधवंत (राष्ट्रीय समाज पक्ष), रमेश भिमराव राठोड (जय सेवालाल बहुजन विकास पार्टी), शेख सलीम शेख इब्राहीम (ऑल इंडिया मजलीस ए इन्कलाब ए मिलत), सुभाष किसन वाव्हळे (बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी), अच्युत लिंबाजी कदम (अपक्ष),…
परभणी ( प्रतिनिधी) परभणी विधानसभा मतदारसंघाकरीता 46 उमेदवारांनी 59 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 37 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची नावेपुढील प्रमाणे आहेत. अशोक किशनराव खरात (बहुजन समाज पार्टी), आनंद शेषराव भरोसे (शिवसेना), डॉ. राहूल वेदप्रकाश पाटील (शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे), श्रीनिवास सुरेशचंद्र लाहोटी (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), ॲड. इम्तीयाज खान आजम खान (ऑल इंडिया मजलीस ए इतेहादूल मुस्लिमिन), डॉ. गोवर्धन भिवाजी खंडागळे (बहुजन भारत पार्टी), चकोर महामुनी सावित्री (राष्ट्रीय समाज पक्ष), विजय आदिनाथराव वरवंटे (बुलंद भारत पार्टी), शेख सलीम शेख इब्राहिम (ऑल इंडिया मजलिस-ए-इन्किलाब-ए-मिल्लत), अतिश बापूराव गरड (अपक्ष), अनिता रवींद्र सोनकांबळे (अपक्ष), ॲड. अफजल बेग साहाब (अपक्ष), अली…
परभणी,(प्रतिनिधी) : एनव्हीएस मराठवाडा हायस्कूलचे राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी)चे ऑफिसर शिरीष जयपूरकर यांचा जवाहन नवोदय विद्यालयात एनसीसीने आयोजित केलेल्या एटीसी कॅम्पमध्ये नियम वयोमानानूसार एनसीसीतून सेवानिवृत्तीबद्दल 52 महाराष्ट्र बटालियन एनसीसी नांदेडचे कमांडिंग ऑफिसर तथा कर्नल रंगाराव यांच्याहस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व मानपत्र प्रदान करुन यथोचित गौरव करण्यात आला. यावेळी एओ तथा कर्नल दिलीप रेड्डी, मेजर प्रशांत सराफ, लेफ्टनंट जयकुमार देशमुख, फर्स्ट ऑफिसर सावळे, सेंकड ऑफिसर रंगनाथ राठोड, थर्ड ऑफिसर सौ. नवशिंदे हे उपस्थित होते. या मान्यवरांनी आपल्या भाषणातून जयपूरकर यांनी एनसीसीत दिलेल्या अमूल्य योगदानाचे मुक्तकंठाने कौतूक केले. त्याचबरोबर एनसीसीचे सुभेदार मेजरसह सर्व परडे इन्स्ट्रक्टर व कार्यालयीन कर्मचारी तसेच कॅम्प्मधील 500 कॅडेट…
परभणी (प्रतिनिधी) शहर महानगरपालिके मार्फत धर्मापुरी जलशुद्धीकरण केंद्र येथे 80 लक्ष लिटर क्षमतेचे बैठा जलकुंभ (संप) बांधण्यात आलेला आहे. सदर बैठा जलकुंभ हा अमृत योजने अंतर्गत बांधण्यात आला आहे. परभणी शहराला येलदरी धरणातून पाणीपुरवठा होत असून येलदरी धरणातून येणारे पाणी धर्मापुरी जलशुद्धीकरण केंद्र येथे शुद्धीकरण करण्यात येत आहे. येलदरी धरणाची उंची धर्मापुरी जलशुद्धीकरण केंद्र पेक्षा 86 मीटर जास्त असल्याने पाण्याचे फ्लो (प्रवाह) मोठा असतो यामुळे जलशुद्धीकरण केंद्र धर्मापुरी येथील विदयुत पुरवठा खंडीत झाल्यास तो पुन्हा सुरळीत होईपर्यंत पाणी वाया जात आहे. सदर वाया जाणा-या पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी व त्यावर योग्य उपाय व पाण्याची बचत करण्यासाठी परभणी महानगरपालिकेने धर्मापुरी जलशुद्धीकरण केंद्र…
पाथरी ( प्रतिनिधी) पाथरी विधानसभा मतदारसंघाकरीता 53 उमेदवारांनी 77 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 47 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. तर 6 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची नावेपुढील प्रमाणे आहेत. राजेश उत्तमराव विटेकर (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), वरपुडकर सुरेश अंबादासराव (इंडियन नॅशनल काँग्रेस), गणेशनाथ आदीनाथ जाधव (स्वराज्य शक्ति सेना), त्रिंबक देविदास पवार (ऑल इंडिया हिन्दुस्थान काँग्रेस पार्टी), मो. फयाजोद्दीन अन्सारी मो. नवाजोद्दीन अन्सारी (ऑल इंडिया मजलिस-ए-इन्कलाब-ए-मिल्लते), सईद खान शेरगुल खान (राष्ट्रीय समाज पक्ष), सचिन सुरेश निसर्गंध (बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी), सुरेश किशनराव फड (वंचित बहुजन आघाडी), अतिश बापुराव गरड (अपक्ष), अब्दुला खान लतीफ खान दुर्रानी (अपक्ष), अभिजित अनंतराव कदम…
परभणी, (प्रतिनिधी) जिल्ह्यातील सर्व खरेदी संस्थांनी सोयाबीन शेतमालाची आद्रता तपासणीबाबत खरेदी केंद्रावर जे शेतकरी सोयाबीनचे नमुने घेऊन येतील त्यांना तात्काळ मॉईश्चर तपासून द्यावे. तसेच गावोगावी आपले कर्मचारी पाठवून सोबत आर्द्रतामापक यंत्र नेऊन शेतकऱ्यांना प्रत्यक्ष सोयाबीन शेतमालाचे प्रात्याक्षिक दाखविण्यात यावे. तसेच 12 टक्के मॉइश्चर पेक्षा कमी आद्रर्ता असलेला व एफएक्यु दर्जाचे सोयाबीनच खरेदी केंद्रावर विक्रीस आणावे, असे आवाहन शेतकरी बांधवांना करावे व सोबत माहितीपत्रकही वाटप करण्यात यावेत, असे जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सूचित केले आहे. ***
परभणी ( प्रतिनिधी) वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या जून २०२४ मध्ये घेतलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेत (नेट) पुन्हा एकदा घवघवीत यश प्राप्त करून महाविद्यालयाची परंपरा कायम ठेवली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये मीरा शिंदे, सुषमा माने, दिव्या भगत, सय्यद बिलाल अझिमुद्दिन, श्वेता पुरोहित यांनी सहाय्यक प्राध्यापक पदासाठी तसेच आचार्य पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्रता मिळवली आहे. विशेष म्हणजे प्राची गट्टानी या कनिष्ठ संशोधन फेलोशिपसाठी पात्र ठरल्या असून त्यांनी राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवले आहे. या विद्यार्थ्यांनी सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर त्यांना महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून निवड होण्याच्या संधी निर्माण झाल्या आहेत.…
परभणी ( प्रतिनिधी) वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या जून २०२४ मध्ये घेतलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेत (नेट) पुन्हा एकदा घवघवीत यश प्राप्त करून महाविद्यालयाची परंपरा कायम ठेवली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये मीरा शिंदे, सुषमा माने, दिव्या भगत, सय्यद बिलाल अझिमुद्दिन, श्वेता पुरोहित यांनी सहाय्यक प्राध्यापक पदासाठी तसेच आचार्य पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्रता मिळवली आहे. विशेष म्हणजे प्राची गट्टानी या कनिष्ठ संशोधन फेलोशिपसाठी पात्र ठरल्या असून त्यांनी राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवले आहे. या विद्यार्थ्यांनी सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर त्यांना महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून निवड होण्याच्या संधी निर्माण झाल्या आहेत.…