परभणी (प्रतिनिधी) : मा. राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूक- 2025 साठीचा कार्यक्रम 4 नोव्हेंबर 2025 रोजी घोषित केला असून त्या दिनांकापासुन आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गंगाखेड, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पुर्णा या नगरपरीषद कार्यक्षेत्रात आचार संहिता लागू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची सार्वत्रिक निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी ज्या ठिकाणी मतदान होणार आहे, त्या ठिकाणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-2023 चे कलम 163 लागू करणे आवश्यक आहे. मतदान केंद्राच्या ठिकाणापासून 100 मीटर परिसराच्या आतील सर्व पक्ष कार्यालये/उमेदवारांचे मंडपे, सर्व दुकाने, सर्व…
Author: Lok Sanchar
पिंगळीतील बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन परभणी, (प्रतिनिधी) दगाबाज सरकारला सर्व जनता वर्षभरातच कंटाळली आहे येणारे सरकार आपलेच असणार आहे ही आपली आपल्या सोबतच सामान्य जनतेची मागणी आहे अशा या दगाबाज सरकारला उलथून टाकण्याची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपासून होणार आहे असे प्रतिपादन आ. डॉ.राहुल पाटील यांनी केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.शुक्रवार दिनांक सात रोजी सायंकाळी सात वाजता परभणी तालुक्यातील पिंगळी येथे त्यांच्या उपस्थित शेतकरी संवाद बैठक होणार आहे. या निमित्ताने आ. डॉ.पाटील यांच्या संपर्क कार्यालयात गुरुवार दिनांक सहा रोजी शिवसेना पक्षाची आढावा बैठक पार पडली. यावेळी बोलताना आ.डॉ.पाटील म्हणाले घोटाळा करून सत्तेत आलेल्या दगाबाज…
परभणी, ः (प्रतिनिधी) मधुमेहासारख्या आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सामान्य लोकांना परवडणाऱ्या आणि तत्काळ उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आ.डॉ.राहुल पाटील यांच्या आर.पी. हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक डायबेटिस स्पेशल क्लिनिकचे हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमीर तडवी, मधुमेह तज्ञ राजवर्धन देशमुख, डॉ. शहाजी बोडखे, डॉ. संतोष हारकळ, डॉ. सलाम तांबोळी, डॉ. दैठणकर पॅथॉलॉजी लॅब मधील ज्ञानेश्वर इक्कर, मुकुंद हलकरे, महेश भाग्यवान,तसेच अंकुशराव मस्के, स्वप्नील बोर्डे,अतुल लोंढे यांसह इतर कर्मचारी उपस्थित होते. मधुमेह हा आजकाल सामान्य होत असलेला आजार असून, त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातच योग्य निदान आणि उपचार केल्यास त्याची गुंतागुंत टाळता येते. आर.पी. हॉस्पिटलने हे…
मुंबई, – : राज्यातील जनतेचे आरोग्य सदृढ राहावे आणि सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या सुविधा विनासायास उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासन सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात अनेक उपक्रम राबवत आहे. याच पार्श्वभूमीवर मुलांमधील असंसर्गजन्य आजार रोखण्यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना (एसओपी) तयार करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले. मुलांमधील असंसर्गजन्य आजार एक वाढती समस्या या विषयी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. कार्यशाळेस युनिसेफचे संजय सिंह, आरोग्य सेवा संचालक, डॉ. विजय कंदेवाड (दूरदृश्य प्रणालीद्वारे), महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. मृदुला फडके, ‘युनिसेफ’चे डॉ. मंगेश गाधारी उपस्थित होते. काही लोकप्रतिनिधी दूरदृश्य…
परभणी,(प्रतिनिधी) :- महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी “स्मार्ट अंगणवाडी किट” खरेदीस राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील सुमारे २६५ अंगणवाडी केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून, या केंद्रांचे रूपांतर आदर्श आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त ‘स्मार्ट अंगणवाड्यां’मध्ये करण्यात येणार आहे. *महिला व बालविकास राज्यमंत्री तथा परभणी जिल्हयाच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले की, “मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी शिक्षण, आरोग्य आणि पोषण या तिन्ही घटकांचा समन्वय साधणारी स्मार्ट अंगणवाडी ही एक नवी क्रांती ठरणार आहे. स्मार्ट अंगणवाडी योजनेमुळे परभणी जिल्हयातील लहान मुलांना सुरक्षित, स्वच्छ आणि आनंददायी शिक्षणाचे वातावरण उपलब्ध होईल. मुलांच्या…
परभणी (प्रतिनिधी) आबांच्या असीम कार्याचे स्मरण करत, त्यांनी दिलेला आदर्श, संस्कार आणि समाजकारणाचा वारसा नेटाने पुढे नेण्याचा आणि जीवनभर त्यासाठी झटण्याचा संकल्प आम्ही दृढ केला आहे,” असे प्रतिपादन ह.भ.प. नामदेव महाराज लबडे यांनी केले. शिक्षण, अध्यात्म, व्यवहार आणि न्याय या सर्वच क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवून समाजासाठी प्रेरणास्त्रोत ठरलेले वैकुंठवासी शिक्षणमहर्षी स्व. शेषरावजी धोंडजी भरोसे यांनी आयुष्यभर साधुसंतांची संगत जोपासली. प्रचंड वैभव आणि ऐश्वर्य असूनही त्यांनी परमार्थाचा मार्ग स्वीकारला आणि परमपूज्य रंगनाथ महाराज गुरुजी यांचे सच्चे सेवक व भक्त म्हणून जीवन व्यतीत केले. स्व. भरोसे (आबा) यांनी आपल्या जीवनात परमार्थ जोपासला, समाजासाठी परमार्थ केला आणि इतरांना परमार्थाच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरित…
परभणी ( प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी, परभणी महानगर यांच्या वतीने आज हॉटेल ग्रीन लिफ, स्टेशन रोड येथे पदवीधर समिती, जिल्हा पदाधिकारी, मंडळाध्यक्ष व शक्तीकेंद्र प्रमुखांची महत्वपूर्ण संघटनात्मक बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. बैठकीस . संजयजी कौडगे (संघटन मंत्री), आ. सुरेशराव वरपुडकर (माजी मंत्री), आयोजक शिवाजीराव भरोसे (जिल्हाध्यक्ष, भाजपा परभणी महानगर),. संतोष मुरकुटे (माजी जिल्हाध्यक्ष, परभणी ग्रामीण) आणि संजय शेळके हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. बैठकीदरम्यान पक्ष संघटनेची सध्याची स्थिती, पदवीधर मतदारसंघातील कार्यसंघटन, शक्तीकेंद्रांचे सशक्तीकरण, सदस्य नोंदणी, मतदार यादीतील नव्या नावांची नोंद तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी राबवायच्या विविध कार्यक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संघटन मंत्री मा. संजयजी कौडगे यांनी…
परभणी (प्रतिनिधी) : प्रशासन – पत्रकारांच्या समन्वयातुन समाजहित साधावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सलग्न जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आज शनिवार 1 नोव्हेंबर रोजी आयोजीत दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार सुभाष कच्छवे तर प्रमुख पाहुणे म्हणुन वनामकृवीचे कुलगुरू डॉ. इंद्र मणि, अप्पर आयुक्त संभाजीनगर डॉ. प्रताप काळे, राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष नानासाहेब भेंडेकर, इंडिया गॉट टॅलेंट च्या माध्यमातून घरोघरी पोहोचलेले, व्हॉइस ऑफ किशोरकुमार गायक राजु काजे,महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गोरे, प्रा. सुनिल तुरूकमाने, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभू दीपके, राज्य कार्यकारिणी सदस्य राजू हट्टेकर, कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर,…
परभणी,(प्रतिनिधी) आ.डॉ.राहुल पाटील यांच्या परभणी मेडिकल कॉलेज, आर.पी हॉस्पिटल तथा संशोधन संस्था परभणीने यंदा पुन्हा एकदा आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षेत कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांनी १०० टक्के यश मिळवले आहे. निकालाचे वैशिष्ट्य आणि विद्यार्थ्यांचे यश म्हणजे यंदाच्या निकालात कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांनी किमान ७० टक्के गुण मिळवले असून, काही विद्यार्थ्यांनी जिल्हा आणि राज्य स्तरावर अव्वल स्थान पटकावले आहे. कॉलेजचे ३०० हून अधिक विद्यार्थी आणि ६० पेक्षा जास्त प्राध्यापक यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाले आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील पी.जी. प्रवेश परीक्षा (NEET-PG) साठी तयार करण्यातही महत्त्वाचा ठरेल. या यशाचे कौतुक आ.डॉ. राहुल पाटील…
परभणी (प्रतिनिधी) – राष्ट्रीय एकता दिवस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी परभणी महानगर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात पालकमंत्री मा.ना.सौ. मेघनादीदी बोर्डीकर, मा. मंत्री सुरेशराव वरपूडकर, भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष. शिवाजीराव भरोसे, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष. सुरेश भुमरे, डॉ. केदार खटिंग आणि सौ. प्रेरणाताई वरपूडकर यांच्या हस्ते गोमाता पूजनाने करण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते “रन फॉर युनिटी” या पदयात्रेला प्रारंभ झाला. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून निघालेल्या या यात्रेचा समारोप गांधी पार्क येथे झाला. या पदयात्रेत हजारो परभणीकरांनी उत्साहाने सहभाग घेत, राष्ट्रीय एकता, अखंडता आणि…

