परभणी (प्रतिनिधी) : मा. राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूक- 2025 साठीचा कार्यक्रम 4 नोव्हेंबर 2025 रोजी घोषित केला असून त्या दिनांकापासुन आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गंगाखेड, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पुर्णा या नगरपरीषद कार्यक्षेत्रात आचार संहिता लागू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची सार्वत्रिक निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी ज्या ठिकाणी मतदान होणार आहे, त्या ठिकाणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-2023 चे कलम 163 लागू करणे आवश्यक आहे. मतदान केंद्राच्या ठिकाणापासून 100 मीटर परिसराच्या आतील सर्व पक्ष कार्यालये/उमेदवारांचे मंडपे, सर्व दुकाने, सर्व प्रकारचे फेरीवाले, मोबाईल, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके व इतर ईलेक्ट्रॉनिक उपकरणे, निवडणूकीच्या कामाव्यतिरीक्त खाजगी वाहने, संबंधीत पक्षाचे उमेदवारांचे चिन्हाचे प्रदर्शन व निवडणूक कामा व्यतिरीक्त इतर व्यक्तीस प्रवेश करण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहे.
जिल्हादंडाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-2023 चे कलम 163 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करुन या आदेशाव्दारे असे निर्देश दिले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूक-2025 ची प्रक्रिया परभणी जिल्ह्यात ज्या ठिकाणी मतदान केंद्रावर मतदान होणार आहे, त्या ठिकाणी 100 मीटर परिसरात सर्व पक्षाचे कार्यालये, उमेदवारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेससेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर ईलेक्ट्रॉनिक उपकरणे, निवडणूकीच्या कामाव्यतिरीक्त खाजगी वाहने, संबंधीत पक्षांचे उमेदवारांचे चिन्हाचे प्रदर्शन व निवडणूक कामाव्यतिरीक्त इतर व्यक्तीस प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.
*-*-*-*-*-*-
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


