परभणी ( प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी, परभणी महानगर यांच्या वतीने आज हॉटेल ग्रीन लिफ, स्टेशन रोड येथे पदवीधर समिती, जिल्हा पदाधिकारी, मंडळाध्यक्ष व शक्तीकेंद्र प्रमुखांची महत्वपूर्ण संघटनात्मक बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
बैठकीस . संजयजी कौडगे (संघटन मंत्री), आ. सुरेशराव वरपुडकर (माजी मंत्री), आयोजक शिवाजीराव भरोसे (जिल्हाध्यक्ष, भाजपा परभणी महानगर),. संतोष मुरकुटे (माजी जिल्हाध्यक्ष, परभणी ग्रामीण) आणि संजय शेळके हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. बैठकीदरम्यान पक्ष संघटनेची सध्याची स्थिती, पदवीधर मतदारसंघातील कार्यसंघटन, शक्तीकेंद्रांचे सशक्तीकरण, सदस्य नोंदणी, मतदार यादीतील नव्या नावांची नोंद तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी राबवायच्या विविध कार्यक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
संघटन मंत्री मा. संजयजी कौडगे यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीत सातत्य, शिस्त आणि संवादाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, “प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षाचे विचार जनतेपर्यंत पोहोचवणे हीच खरी संघटनाची ताकद आहे.”
माजी मंत्री मा. आ. सुरेशराव वरपुडकर यांनी पदवीधर मतदारसंघातील कार्याचा अनुभव शेअर करत कार्यकर्त्यांना संघटितपणे काम करण्याचे आवाहन केले.
महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे यांनी बैठकीचे उद्दिष्ट स्पष्ट करत सांगितले की, “भाजप ही केवळ राजकीय पक्ष नसून ती एक विचारप्रणाली आहे. प्रत्येक शक्तीकेंद्र हे पक्षाचे कणा असून त्याची मजबुती हाच आपला प्रमुख ध्येय आहे.” बैठकीत विविध मंडळाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी आपले मते व सूचना मांडल्या. बैठकीच्या शेवटी आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या जनसंपर्क मोहिमा, प्रशिक्षण शिबिरे आणि सामाजिक उपक्रमांबाबत ठोस नियोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस भालचंद्र गोरे यांनी केले. बैठकीत उपस्थित सर्व पदाधिकारी, मंडळाध्यक्ष, शक्तीकेंद्र प्रमुख व कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला आणि पक्षविस्तारासाठी नवे संकल्प व्यक्त केले.
Thursday, May 21
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा पुन्हा भगवामय करणार – आमदार डॉ राहुल पाटील यांचा निर्धार : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
- चाळीशीत वाढताहेत ‘हार्ट अटॅक’चे प्रमाण; आर.पी. हॉस्पिटलचा ‘TMT’ उपक्रम अवघ्या ३०० रुपयांत
- नानलपेठ पोलीस ठाण्यात २४ बेवारस दुचाकी वाहनांचा २८ मे रोजी जाहीर लिलाव
- पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती मृत्यु प्रकरणाचा जलद गतीने तपास करा; वसमत रोडवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची पत्रकारांची मागणी
- राष्ट्रीय स्पर्धेसाठी डॉ. पंकज खेडकर यांची परीक्षक म्हणुन निवड* ; पुण्यात रंगणार ‘भारत उत्सव २०२६’चा सोहळा; लोककला आणि अभिनयाचा अविष्कार
- ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती निधन ; गंगाखेड येथे अंत्यसंस्कार
- निर्वाचित पक्ष, गट व अपक्षांसाठी महत्त्वाची सूचना: ११ मेपूर्वी आघाडी नोंदणी आवश्यक
- परभणीत 7 मे रोजी गुरव समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा व मौंजी संस्कार कार्यक्रम


