परभणी, ः (प्रतिनिधी) मधुमेहासारख्या आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सामान्य लोकांना परवडणाऱ्या आणि तत्काळ उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आ.डॉ.राहुल पाटील यांच्या आर.पी. हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक डायबेटिस स्पेशल क्लिनिकचे हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमीर तडवी, मधुमेह तज्ञ राजवर्धन देशमुख, डॉ. शहाजी बोडखे, डॉ. संतोष हारकळ, डॉ. सलाम तांबोळी, डॉ. दैठणकर पॅथॉलॉजी लॅब मधील ज्ञानेश्वर इक्कर, मुकुंद हलकरे, महेश भाग्यवान,तसेच अंकुशराव मस्के, स्वप्नील बोर्डे,अतुल लोंढे यांसह इतर कर्मचारी उपस्थित होते.
मधुमेह हा आजकाल सामान्य होत असलेला आजार असून, त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातच योग्य निदान आणि उपचार केल्यास त्याची गुंतागुंत टाळता येते. आर.पी. हॉस्पिटलने हे समजून घेऊन हा स्पेशल क्लिनिक सुरू केला असून, येथे रक्तातील साखरेची तपासणी, HbA1c चाचण्या, लिपिड प्रोफाइल आणि इतर आवश्यक तपासण्या अत्यल्प दरात उपलब्ध होणार आहेत.
यावेळी बोलताना डॉ. शिंदे म्हणाले,आ. डॉ.राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आर.पी. हॉस्पिटलमध्ये हे क्लिनिक सुरू करून सामान्य रुग्णांना परवडणाऱ्या दरात तत्काळ उपचार उपलब्ध करून देत आहोत. येथे केवळ तपासण्या नव्हे, तर आहारविषयक सल्ला, व्यायाम मार्गदर्शन आणि नियमित फॉलो-अप सुविधाही दिल्या जाणार आहेत.असे त्यांनी सांगीतले.या सुवीधेचा लाभ घेण्याचे आवाहन हॉस्पिटल प्रशासनाने केले आहे.


