परभणी, (प्रतिनिधी) माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त राष्ट्रीय संकल्प दिन तसेच लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण, संतोषी देवकूळे, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर, नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर यांच्यासह उपस्थित अधिकारी –कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकता दिनाची शपथ घेतली.
*-*-*-*


