परभणी,(प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या शासकीय सुट्ट्यांव्यतिरिक्त स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या अधिकारातील सुट्ट्या जाहीर करण्याच्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी वर्षातील तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर केल्या होत्या. त्यात 31 ऑक्टोंबर रोजी नरक चतुर्थीनिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. परंतु, त्यात बदल करीत आता 7 डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली असल्यामुळे उद्या शासकीय व निमशासकीय कार्यालय सुरु राहणार आहेत. दि. 26 डिसेंबर 2023 च्या अधिसुचनेनुसार 31 ऑक्टोबर, 2024 रोजीची दिपावलीची (नरक चतुर्दशी) सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्याऐवजी दि. 4 जानेवारी 2024 च्या सुधारित अधिसूचनेनुसार दि. 7 डिसेंबर 2024 रोजीची चंपाषष्टीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार दि. 31 ऑक्टोबर रोजी…
Author: Lok Sanchar
गंगाखेड ( प्रतिनिधी) गंगाखेड विधानसभा मतदारसंघाकरीता 29 उमेदवारांनी 38 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 25 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले तर 4 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची नावेपुढील प्रमाणे आहेत. कदम विशाल विजयकुमार (शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे), देशमुख रुपेश मनोहरराव (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), मदनजी रेनगडे पाटील (न्यु राष्ट्रीय समाज पार्टी), माधव सोपानराव शिंदे (राष्ट्रीय मराठा पार्टी), रत्नाकर माणिकराव गुट्टे (राष्ट्रीय समाज पक्ष), विठ्ठल जीवनाजी रबदडे (जनहित लोकशाही पार्टी), सिताराम घनदाट (मामा) (वंचित बहुजन आघाडी), अलका विठठल साखरे (अपक्ष), कदम संजय साहेबरराव (अपक्ष), कदम स्मिता संजय (अपक्ष), जलील गुलाब पटेल (अपक्ष), जोगदंड मुंजाजी नागोराव (अपक्ष), नामदेव रामचंद्र गायकवाड (अपक्ष), प्रविण…
निवडणूक विशेष परभणी:- विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका २०२४ जाहीर होऊन प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. न्याय्य आणि नि:पक्षपाती वातावरणात निवडणुका पार पडाव्यात यासाठी भारत निवडणूक आयोगाने काही नियम ठरवून दिले आहेत. या नियमांनाच ‘आचारसंहिता’ म्हटले जाते. निवडणूक घोषित झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी या आचारसंहितेचे पालन करणे अनिवार्य असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. आचारसंहिता अधिक विस्तृत असल्याने त्यापैकी निवडणूक काळात राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’ याबाबत काही महत्त्वाची तत्वे सांगितलेली आहेत. आचारसंहिता काळात काय करावे? निवडणूक घोषित होण्यापूर्वी सुरू करण्यात आलेले कार्यक्रम पुढे सुरू ठेवता येतील. पूर, अवर्षण इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे…
पालम (प्रतिनिधि) मंगळवार दि.29 रोजी ग्रामीण रुग्णालय पालम येथे डायलिसिस unit चे लोकार्पण मा. जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. नागेशजी लाखमावर यांनी केले, या वेळी डॉ. रमेश.खंदारे डॉ. कालिदास.निरस , डॉ. आमोल रोकडे, डॉ. स्वामी, डॉ. काळे, डॉ. भस्के, डायलिसिस विभागाचे सर्व तंत्रज्ञ, स्टाफ, रुग्णालयातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. पालम रुग्णालयात किडनी निकामी झालेले रुग्ण, किडनी च्या इतर रोगांनी रेग्युलर डायलिसिस घ्यावे लागणाऱ्या रुग्णांसाठी 5 डायलिसिस मशीन असणारे अद्ययावत युनिट कार्यान्वित झालेले आहे,
परभणी, (प्रतिनिधी) :- निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती के. हरिता, निवडणूक निरीक्षक (सामान्य) संचिता बिष्णोई आणि निवडणूक निरीक्षक (पोलीस) राजेश दुग्गल यांनी आज परभणी जिल्ह्यातील जिंतूर, परभणी, गंगाखेड व पाथरी विधानसभा मतदारसंघांतील निवडणूक विषयक बाबी व कायदा सुव्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. भारत निवडणूक आयोगाने जिंतूर व परभणी या दोन विधानसभा मतदारसंघांकरीता श्रीमती के. हरीता तर गंगाखेड व पाथरी या दोन विधानसभा मतदारसंघांकरीता़ संचिता बिष्णोई आणि निवडणूक निरीक्षक (पोलीस) म्हणून राजेश दुग्गल यांची नियुक्ती केली आहे. आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील चारही मतदारसंघांचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य…
गंगाखेड ( प्रतिनिधी) 97- गंगाखेड विधानसभा मतदारसंघ येथे आज 12 उमेदवारांनी 18 नामनिर्देशन पत्र दाखल केले.एकूण 29 उमेदवारांनी 38 नामनिर्देशन पत्र दाखल झाले अंगेंत. आज 12 उमेदवारांनी 18 नामनिर्देशन पत्र दाखल. ॲड. संजीव देवराव प्रधान (अपक्ष), शेख हबीब शेख रसूल (अपक्ष), रुपेश मनोहरराव देशमुख (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) यांनी दोन अर्ज, विशाल बबनराव कदम (अपक्ष), रत्नाकर माणिकराव गुट्टे (राष्ट्रीय समाज पक्ष) यांनी दोन अर्ज, कदम विशाल विजयकुमार (शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे), अलका विठ्ठल साखरे (बहुजन मुक्ती पार्टी), विठ्ठल जीवनाजी रबदडे (जनहित लोकशाही पार्टी), राजभोज राजकुमार बाबुराव (अपक्ष), श्रीकांत दिगांबर भोसले (अपक्ष), विठ्ठल सोपान निरस (अपक्ष), विशाल बालाजीराव कदम (अपक्ष),जलील गुलाब पटेल (अपक्ष),…
परभणी,(प्रतिनिधी) : परभणी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी व महायुतीच्या तूल्यबळ प्रतिस्पर्धी उमेदवारांसह अन्य छोटे पक्ष व अपक्ष असे एकूण 46 इच्छुकांचे 59 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या मतदारसंघातील विद्यमान आमदार डॉ. राहुल पाटील यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून तर त्यांचे प्रतिस्पर्धी आनंद भरोसे यांनी महायुतीतून शिवसेनेच्या शिंदे गटाकडून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला. मंगळवारी दुपारी 3 वाजेपर्यंत म्हणजे अंतीम मुदतीपर्यंत एकूण 46 इच्छुकांनी 59 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आतापर्यंत एकूण 93 इच्छुकांनी 150 उमेदवारी अर्ज खरेदी केले होते. मंगळवारी 12 इच्छुकांना 13 उमेदवारी अर्ज वितरित करण्यात आले होते. मंगळवारी 22 इच्छुकांनी 26 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, अली…
परभणी, (प्रतिनिधी): जिल्हा कोषागारामार्फत निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्ती वेतनधारक/ कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी नोव्हेंबर महिन्यात हयात दाखला सादर करणे आवश्यक आहे. हयात दाखला नोंदविण्यासाठी बँकेत यादी पाठविली असून, तो बँकेत सादर करण्याचे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी दत्ता भांगे यांनी केले आहे. निवृत्तीवेतन सुरु ठेवण्याकरिता 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी प्रत्यक्ष बँकेत उपस्थित राहून यादीतील त्यांच्या नावासमोर स्वाक्षरीच्या रकान्यात स्वाक्षरी अथवा अंगठ्याचा ठसा उमटवावा तसेच कार्यरत मोबाईल क्रमांक, पुनर्विवाह व पुनर्नियुक्तीबाबत माहिती लागू असल्यास ती नोंदवावी या पद्धतीशिवाय बायोमॅट्रीक्स पद्धतीने जीवन प्रमाण दाखला देण्याकरीता http://jeevanpraman.gov.in या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध आहे. या यादीत स्वाक्षरी अथवा अंगठा अथवा ऑनलाईन जीवन प्रमाण…
परभणी, ( प्रतिनिधी) : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि इंडियन सोसायटी ऑफ ग्रीकल्चरल इंजिनिअर्स, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नेक्स्ट-जेन डिजिटल कृषीसाठी अभियांत्रिकी नवकल्पना’ या विषयावर इंडियन सोसायटी ऑफ ग्रीकल्चरग्रीकल्चरल इंजिनिअर्सची 58 वे वार्षिक अधिवेशन आणि ‘कृषी परिवर्तनाकरिता इच्छुक युवकांसाठी कृषी अभियांत्रिकी शिक्षण’ या विषयावर 12 ते 14 नोव्हेंबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादात कृषी अभियांत्रिकीमधील नाविन्यपूर्ण उपाय आणि प्रगती यावर चर्चा करण्यासाठी देश-विदेशातील 500 पेक्षा भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे अधिकारी व शास्त्रज्ञ, देशातील विविध राज्यातील कृषि विद्यापीठांचे कुलगुरू, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघटना उद्योगांचे प्रतिष्ठित प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि शास्त्रज्ञ, उद्योजक, विविध विभागातील मान्यवर,…
परभणी,(प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा बॅडमिंटन संघटना परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत पुणे विभागाच्या संघाचे वर्चस्व राहिले. 14 वर्षाखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक प्रियदर्शनी स्कूल एसएससी पुणे -पुणे विभाग, द्वितीय क्रमांक सेवा सदन सक्षम स्कूल नागपूर – नागपूर विभाग तर तृतीय क्रमांक वूडरिच हायस्कूल छत्रपती संभाजी नगर – छत्रपती संभाजी नगर विभागाच्या संघाने पटकावला. 17 वर्षाखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक डीएसपी इंटरनॅशनल स्कूल रायगड -मुंबई विभाग, द्वितीय क्रमांक सर परशुरामभाऊ कॉलेज पुणे, पुणे विभाग तर तृतीय क्रमांक सेंड जोसेफ…