पालम (प्रतिनिधि) मंगळवार दि.29 रोजी ग्रामीण रुग्णालय पालम येथे डायलिसिस unit चे लोकार्पण मा. जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. नागेशजी लाखमावर यांनी केले,
या वेळी डॉ. रमेश.खंदारे डॉ. कालिदास.निरस , डॉ. आमोल रोकडे, डॉ. स्वामी, डॉ. काळे, डॉ. भस्के, डायलिसिस विभागाचे सर्व तंत्रज्ञ, स्टाफ, रुग्णालयातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. पालम रुग्णालयात किडनी निकामी झालेले रुग्ण, किडनी च्या इतर रोगांनी रेग्युलर डायलिसिस घ्यावे लागणाऱ्या रुग्णांसाठी 5 डायलिसिस मशीन असणारे अद्ययावत युनिट कार्यान्वित झालेले आहे,



