परभणी,(प्रतिनिधी) : परभणी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी व महायुतीच्या तूल्यबळ प्रतिस्पर्धी उमेदवारांसह अन्य छोटे पक्ष व अपक्ष असे एकूण 46 इच्छुकांचे 59 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
या मतदारसंघातील विद्यमान आमदार डॉ. राहुल पाटील यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून तर त्यांचे प्रतिस्पर्धी आनंद भरोसे यांनी महायुतीतून शिवसेनेच्या शिंदे गटाकडून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला. मंगळवारी दुपारी 3 वाजेपर्यंत म्हणजे अंतीम मुदतीपर्यंत एकूण 46 इच्छुकांनी 59 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आतापर्यंत एकूण 93 इच्छुकांनी 150 उमेदवारी अर्ज खरेदी केले होते. मंगळवारी 12 इच्छुकांना 13 उमेदवारी अर्ज वितरित करण्यात आले होते. मंगळवारी 22 इच्छुकांनी 26 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
दरम्यान, अली खान मोईन खान (अपक्ष), अ. पाशा अ. गफार खुरेशी यांनी अपक्ष व बहुजन समाज पार्टीच्यावतीने प्रत्येकी एक अर्ज, किशोर सखाराम रनेर (अपक्ष), नासेर शरीफ शेख यांनी अपक्ष व नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टीच्यावतीने प्रत्येकी एक, सय्यद समी सय्यद साहेबजान (वंचित बहुजन आघाडी), बालाजी नामदेवराव मोहिते (अपक्ष), सावित्री कालिदास महामुनी (राष्ट्रीय समाज पक्ष), आनंद शेषराव भरोसे (शिवसेना), गजानन विश्वनाथ जोगदंड (अपक्ष), फारुख खान रऊफ खान (अपक्ष), त्रिंबक देविदास पवार यांनी अपक्ष व मराठवाडा मुक्ती मोर्चाच्यावतीने प्रत्येकी एक, गोविंद रामराव देशमुख (अपक्ष), छत्रगुण गणेशराव आवचार (अपक्ष), राजकुमार पुरभाजी एंगडे (बहुजन समाज पार्टी), सय्यद नौमान हुसैनी सय्यद उस्मान हुसैनी यांनी अपक्ष व इंडियन युनियन मुस्लीम लिगच्यावतीने प्रत्येकी एक, राहुल वेदप्रकाश पाटील (शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे), संप्रिया राहुल पाटील यांनी अपक्ष व शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने प्रत्येकी एक, सय्यद अतीक उर रहेमान यांनी अपक्ष व इंडियन नॅशनल काँग्रेसच्यावतीने प्रत्येकी एक, महेमूद खान (अपक्ष), अब्दुल रज्जाक अब्दुल रहेमान (अपक्ष), मोहम्मद गौस शेख अमीर यांनी अपक्ष व ऑल इंडिया मजलिस-ए-इतेहादुल मुस्लिमिन पक्षाच्यावतीने नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.


