परभणी,(प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा बॅडमिंटन संघटना परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत पुणे विभागाच्या संघाचे वर्चस्व राहिले.
14 वर्षाखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक प्रियदर्शनी स्कूल एसएससी पुणे -पुणे विभाग, द्वितीय क्रमांक सेवा सदन सक्षम स्कूल नागपूर – नागपूर विभाग तर तृतीय क्रमांक वूडरिच हायस्कूल छत्रपती संभाजी नगर – छत्रपती संभाजी नगर विभागाच्या संघाने पटकावला. 17 वर्षाखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक डीएसपी इंटरनॅशनल स्कूल रायगड -मुंबई विभाग, द्वितीय क्रमांक सर परशुरामभाऊ कॉलेज पुणे, पुणे विभाग तर तृतीय क्रमांक सेंड जोसेफ कॉन्व्हेंट गर्ल हायस्कूल नागपूर, नागपूर विभागाच्या संघाने पटकावला.
19 वर्षाखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल पुणे, पुणे विभाग, द्वितीय क्रमांक- फ्रावशी अकॅडमी एसएससी नासिक – नाशिक विभाग तर तृतीय क्रमांक पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालय छत्रपती संभाजी नगर, छत्रपती संभाजी नगर विभागाच्या संघाने पटकावला. दरम्यान, या सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन होत आहे.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


