परभणी, (प्रतिनिधी)– समाजात आज विस्तारीत जाणारी सामाजिक दरी कमी करण्यासाठी सर्वांनीच सामाजिक सलोखा आणि शांततेकरीता पुढाकार घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य (सचिव दर्जा) ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केले. परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची झालेली अवमानाची घटना व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी ॲड. मेश्राम आज परभणी शहराच्या दौऱ्यावर आले होते. यानिमित्ताने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक व पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी सदर आवाहन केले. ॲड. मेश्राम यांनी सकाळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर परिसराची पाहणी केली व घडलेल्या घटनेची…
Author: Lok Sanchar
परभणी (प्रतिनिधी) डाॅ घनश्यामराव देशपांडे रा.रामकृष्ण नगर परभणी ( हल्ली मुक्काम पुणे) यांच पुणे येथे दु:खद निधन दि.17.12.2024 रोजी झाले. मृत्यू समय त्यांचे वय 75 वर्षे होते . डॉ घनश्याम देशपांडे हे मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे प्लॅन्ट पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंट चे प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणुन सन 2010 मध्ये सेवा निवृत्त झाले होते. पश्चात दोन मुली व नातवंड पुणे येथे आहेत. त्यांच्यावर पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
परभणी,(प्रतिनिधी) : राहणार नांदखेडा येथील शांताबाई वसंतराव पांडे यांचे मंगळवारी (दि.17) रोजी रात्री अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. मृत्यूसमयी त्या 84 वयाच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सून, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. सुनील वसंतराव पांडे यांच्यां त्या मातोश्री होत्या. त्यांच्या पार्थीवावर उद्या बुधवार 18 डिसेंबर रोजी सकाळी 10:00 वाजता नांदखेडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. लोकसंचार परिवारातर्फे भावपुर्ण श्रद्धांजली.
परभणी, (प्रतिनिधी) : भारतीय रिपब्लिकन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांचे सोमवारी (दि.16) रात्री निधन झाले. त्यांच्या पार्थीवावर मंगळवारी (दि.17) रात्री खंडोबा बाजार स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. लोकनेते विजय वाकोडे यांचे पार्थीव दिवसभर राहुल नगरातील समाज मंदिरासमोरील मैदानात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास फुलांनी सजवलेल्या ट्रकमध्ये पार्थिव ठेवण्यात आले. पार्थिवासोबत उपस्थित भिक्कू संघाने पंचशील व त्रिशरण घेतले. सायंकाळी राहत्या घरापासून वाकोडे यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. राहुल नगरातून निघालेली अंत्ययात्रा महात्मा फुले कॉलनी, कारेगाव रोड मार्गे गौतम नगर, शिवाजी नगरातून वसमत रोडला पोहोचली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या…
परभणी, (प्रतिनिधी) : शासकिय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळाल्यामुळे त्यांच्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागू करण्यात आली आहे. अशा अर्जातील त्रुटींची पूर्तता 31 डिसेंबरपर्यंत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेवू शकत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांपैकी इयत्ता 11 वी, 12 वी तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगरव्यावसायिक अभ्यास क्रमामध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयांत-शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामधील मुला-मुली प्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न…
मिश्किली हास्य कवितांच्या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद सेलू (प्रतिनिधी) एकत्र कुटुंब पद्धतीत संवाद होता. नात्यांची वीण घट्ट होती. एकत्र कुटुंब पद्धती ही भारताची ताकद आहे. स्त्रियांनी कुटुंब एकत्र ठेवले आहे. असे प्रतिपादन प्रसिद्ध हास्य कवी अशोक नायगावकर ( मुंबई ) यांनी केले. शहरातील साई नाट्यगृहात सोमवार ( दि. १६ ) रोजी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे मित्रमंडळाच्या वतीने प्रसिद्ध हास्य कवी अशोक नायगावकर यांच्या ‘मिश्किली’ हास्य कवितांच्या कार्यक्रमास श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अशोक नायगावकर यांनी श्रोत्यांशी मिश्किल संवाद साधत आपल्या विनोदी शैलीत सादर केलेल्या विडंबनाने सेलूकर रसिकांना खळखळून हसवले. तर गंभीर कवितांनी अंतर्मुखही केले. राजकीय चर्चेवर व्यंगात्मक टिका करताना ते म्हणाले की,…
परभणी,(प्रतिनिधी) : ज्ञानसाधना प्रतिष्ठान अंतर्गत रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये वर्ग आठवी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सायंटिस्ट आपल्या भेटीला’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी तसेच विज्ञानातील काही पायाभूत संकल्पनांचे आकलन होण्यासाठी वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. सायंटिस्ट आपल्या भेटीला हा त्यातीलच एक उपक्रम आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शास्त्रज्ञ तथा अहमदाबाद येथील अंकुर हॉबी सेंटरचे संचालक धनंजय रावल तर प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेच्या सचिव प्रा. सौ. शीतल सोनटक्के, विजय नरवाडे, परभणी ऍस्ट्रॉनॉमिक सोसायटीचे सचिव सुधीर सोनुनकर यांची उपस्थिती होती. धनंजय रावल यांनी विद्यार्थ्यांना निरीक्षणातून विज्ञान कसे शिकले पाहिजे. तसेच ऍस्ट्रॉनॉमी या शाखेचे व यातील विविध संकल्पनांचे…
परभणी,(प्रतिनिधी) : भारतीय रिपब्लिकन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आंबेडकरी चळवळीतील संघर्षशील नेतृत्व विजय वाकोडे यांचे सोमवारी (दि.16) रात्री र्हदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते 63 वर्षांचे होते. या घटनेने सर्वांना मोठा धक्का बसला आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीच्या काचेची तोडफोड करीत संविधानाचा अवमान केल्याची घटना 10 डिसेंबर रोजी घडली. घटना घडल्या बरोबर ज्येष्ठ नेते वाकोडे यांनी घटनास्थळी धाव घेतली व तेथील स्फोटक परिस्थिती तात्काळ ओळखून तातडीने अत्यंत संयमाची भूमिका घेतली. दुसर्या दिवशीसुद्धा या घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदच्या आंदोलनात दरम्यान वाकोडे यांनी संपूर्ण बंद शांततेत आणि सुरळीतपणे पार पडावा या दृष्टिकोनातून प्रयत्न…
पालम (प्रतिनिधी ) मराठवाड्याला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते, यांच मराठवाड्यातील पालम येथे ग्रामदैवत खंडोबाचा आगळा-वेगळा पालखी सोहळा मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. दि, १७ रोजी बुधवारी इतिहासाची साक्ष देणारा हा आगळावेगळा सोहळा संपन्न झाला यावेळी पंचक्रोशीतील भावीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालम येथे खंडोबाचे हेमाडपंती मंदिर आहे,मंदिरातील सभागृहात असलेला कोरीव शिलालेख पौराणिक शिल्पलेखाचा आदर्श नमुना आहे. महाराष्ट्रात जेजुरी, पाली,नळदुर्ग, माळेगाव आदी अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत. या देवतेच्या उत्सवासाठी पांडे, पत्की, गुरव, मालीपाटील, पाटील हे पाच मानकरी नेमले आहेत. मार्गशिर्ष शु.७ पासून मार्गशिर्ष शु. पौर्णिमेपर्यंत खंडोबाचा उत्सव असतो. या काळात मानकरी शाहूराव पत्की यांच्या देवघरातील अश्वारुढ खंडोबाची मूर्ती मंदिरापर्यंत नेण्यात…
परभणी, (प्रतिनिधी) संयुक्त राष्ट्र संघटनेने दि. 18 डिसेंबर, 1992 रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्काचा जाहीरनामा स्विकृत करून प्रस्तृत केला आहे. त्यानुसार अल्पसंख्याक नागरिकांना त्यांची संस्कृती, भाषा, धर्म, परंपरा इत्यादींचे संवर्धन करता यावे यादृष्टीने प्रयत्न करण्याबाबत राष्ट्रीय आयोगाने सूचना दिल्या करण्यात येणार आहे. अल्पसंख्यांक समाजातील नागरीकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून आपला सहभाग आहेत. त्यानुसार प्रत्येक वर्षी दि. 18 डिसेंबर हा दिवस जिल्हा प्रशासनाच्या वतीने “अल्पसंख्याक हक्क दिवस” म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाच्या निमित्ताने अल्पसंख्याकांना त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्काबाबत जाणीव/ माहिती करून दिली जाणार आहे. त्या अनुषंगाने दि. 18 डिसेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे दुपारी…

