परभणी( प्रतिनिधी) क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, व जिल्हा बॅडमिंटन संघटना परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेचे आज सकाळी 11 वाजता माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांच्या शुभहस्ते उद्घाटन झाले.
या स्पर्धेसाठी परभणी जिल्हा सेटल बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष विजयसिंह जामकर व सचिव माननीय रवींद्र पतंगे हे ही उपस्थित होते. या स्पर्धेसाठी आलेले राज्याचे निवड समिती सदस्य चंद्रहास कान्हेरे, सातारा व मल्हार कुलकर्णी, अहमदनगर व परभणी जिल्ह्याचे बॅडमिंटन क्रीडा मार्गदर्शक श्री उन्मेष गाडेकर व स्थानिक पंच म्हणून विकास जोशी, स्वरूप सोनिक, अजिंक्य गाडेकर, सुमित वाघ, श्री गायकवाड, वंशिका तुलसानी, देशमुख , पृथ्वीराज हाके, अनुष निर्वळ हे सर्व स्पर्धेचे कामकाज पाहत आहेत.
या स्पर्धेसाठी १४/१७/१९ वर्षाखालील मुली राज्यभरातून 8 विभागातून खेळाडू या ठिकाणी सहभागी झाले.
एकूण 120 खेळाडू व 75 निवड चाचणीसाठी असे 200 खेळाडूंनी सहभाग नोंदवला यात अनेक राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय खेळाडू यांची चुरस या स्पर्धेनिमित्त परभणीकरांना बघण्यास मिळत आहे. उद्या निवड चाचणी यामधून राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडू निवड होतील.
या स्पर्धा यशस्वी करण्याकरिता कार्यालयातील नानकसिंग बस्सी, संजय मुंडे क्रीडा अधिकारी, सुयश नाटकर, क्रीडा अधिकारी, रोहन औंढेकर, क्रीडा अधिकारी, कल्याण पोले, क्रीडा मार्गदर्शक, रमेश खुणे वरिष्ठ लिपीक, भागवत कनिष्ठ लिपिक व मानधनवरील कर्मचारी धीरज नाईकवाडे, योगेश आदमे आणि प्रकाश पंडित यांनी काम पाहिले. ( छाया- उत्तम बोरसुरीकर)