गंगाखेड,(प्रतिनिधी) : गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे विद्यमान आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे हे महायुती पुरस्कृत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
मंगळवार 29 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता ते गंगाखेडातील गोदाकाठावरील बालाजी मंदिरपासून पदयात्रेद्वारे उमेदवारी अर्ज भरण्याकरीता निघणार आहेत. श्रीराम चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत ही पदयात्रा निघणार असून त्याद्वारे गुट्टे हे तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात विजय संकल्प सभा होणार असल्याची माहिती गुट्टे समर्थकांनी दिली.