परभणी,(प्रतिनिधी) : गेल्या दहा वर्षांपासून फरार असणार्या कलम 379 मधील गुन्ह्यातील आरोपीस स्थानिक गुन्हा अन्वेषन विभाग व नक्षल सेलच्या पथकाने बुलढाणा जिल्ह्यातून ताब्यात घेतले.
आगामी सार्वत्रित निवडणूका शांततेत व सुरळीत पार पडाव्यात या दृष्टीने स्थानिक गुन्हा अन्वेषन विभागाने विविध गुन्ह्यातील फरारी आरोपींविरोधात शोध मोहिम सुरु केली आहे. त्यात नानलपेठ पोलिस ठाण्यात भादंवि कलम 379 मधील गुन्ह्यात गेल्या दहा वर्षांपासून फरार असणारा नंदू उर्फ नंदकिशोर उर्फ धर्मा अशोक वानखेडे यास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग व नक्षल सेलच्या पथकाने मेहकर तालुक्यातील मुळी या गावातून 24 ऑक्टोंबर रोजी सापळा रचून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. या आरोपीची पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड, अंमलदार मधुकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, नक्षल सेलचे निलेश परसोडे आदींनी या मोहिमेत भाग घेतला.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


