परभणी ( प्रतिनिधी)विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे परभणी विधानसभेचे उबाठा गटाचे उमेदवार म्हणून आ.डॉ.राहुल पाटील मंगळवारी (दि.२९)रोजी परभणी विधानसभा मतदारसंघासाठी अर्ज दाखल करणार असून यावेळी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे उपस्थित राहणार असल्याची माहिती आ. डॉ.राहुल पाटील यांनी दिली.
शनिवारी ( दि26) आ.डॉ.राहुल पाटील यांच्या संपर्क कार्यालयातील बैठकीस आ.डॉ.राहुल पाटील व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. मंगळवारी (दि.२९)रोजी परभणी विधानसभा मतदारसंघासाठी अर्ज दाखल करणार आहे. यावेळी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार डॉ.राहुल पाटील यांनी दिली.
बैठकीस कृ.ऊ.बा.सभापती पंढरीनाथ घुले, यांच्यासह युवासेना, शिवसेना, महिला आघाडी, दलित आघाडीसह विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळीं मार्गदर्शन करताना आ. राहूल पाटील म्हणाले, उबाटा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी परभणी मतदारसंघावर आणि मतदारांवर कायमच प्रेम केले आहे. यामुळे नेहमी परभणीकरांच्या हाकेला ते सकारात्मक प्रतिसाद देतात. हीच संधी पुन्हा एकदा चालून आली आहे. परभणी विधानसभेसाठी उबाठा गटाकडून अर्ज दाखल करण्यास युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे परभणीत स्वत: मंगळवारी (दि.२९) उपस्थित राहणार आहेत. मंगळवारी (दि.२९) रोजी परभणी विधानसभेसाठी अर्ज दाखल करताना सकाळी 10 वाजता शनिवार बाजार ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढली जाणार आहे. त्यांच्या उपस्थितीत हजारोंच्या संख्येने मतदार, पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने रॅली काढून अर्ज दाखल करणार आहे.
मतदारसंघातील महाविकास आघाडीची ताकद दाखवून देण्यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते,युवक वर्ग, महिला मतदार यांच्यासह विविध आघाड्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यामध्ये मोठया संख्येने सहभागी व्हावे. विधानसभा मतदारसंघ अंतर्गत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, पदाधिकारी यांची सुद्धा अर्ज दाखल करण्यास उपस्थिती राहणार आहे. यामध्ये खा.संजय जाधव, खा.फौजीया खान, आ.सुरेश वरपूडकर, विजय गव्हाणे यांच्यासह महा विकास आघाडीतील जिल्हाध्यक्ष, आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी प्रमुख आघाड्यांचे पदाधिकारी हे सुध्दा सहभागी होणार आहेत.