परभणी ( प्रतिनिधी)विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे अनुषंगाने मदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे प्रथम प्रशिक्षण दि. 2610/2024 व 2710/2024 रोजी ऑडीटोरीय हॉल वसंतराव नाईक कृषी विदयापीठ परभणी येथे दोन सत्रामध्ये आयोजीत करण्यात आले होते.
प्रथम सत्रात एकुण 560 अधिकारी, कर्मंचारी यांचे पैकी 492 अधकारी, कर्मचारी हजर असून 68 कमेचारी गैरहजर होते. तसेच दुपार सत्रात एकुण 484 अधिकारी, कर्मंचारी यांचे पैकी 438 अधिकारी कर्मंचारी हजर असुन 49 कमचारी गैरहजर होते.
सदर प्रशिक्षणसाठी उपस्थित सर्व नियुक्त अधिकारी , कर्मचारी यांना दतू बाळू शेवाळे निवडण्क निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तसेच संदीप राजपूरे सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार परभणी यांनी यथोचित मार्गदर्शन केले. ‘तसेच सर्व नियुक्त मतदान केंद्र अध्यक्ष व मतदान अधिकारी यांना ‘मास्टर ट्रेनर काचगुंडे यांनी EVM व VVPAT मतदान यंत्र सिल करण्याबाबत मागदर्शन केले व त्यांचे हॅन्डऑन प्रशिक्षण घेण्यात आले.
सदर प्रशिक्षणास गैरहजर अधिकारी, कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस देवून त्यांचे विरुध्द निवडणू्क विषयक शासकीय कामकाजात टाळाटाळ केल्याप्रकरणी लोप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 134 (ब) अन्वये कारवाई प्रस्तावित करण्यात येणार असल्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले. सर्व नियुक्त अधिकारी कर्मचारी यांनी त्यांना नेमुण दिलेले कर्तव्य अचुक पार पाडावे सदर प्रकरणी कुठलीही टाळाटाळ करण्यात येऊ नये असे आवाहन निवडण्क निर्णय अधिकारी यांनी केले.
सदर प्रशिक्षणास श्रीमती आम्रपाली कासोदकर सा.नि.नि.अ.तथा तहसिलदार सामान्य, उमाजी बोथीकर साःनिःनि.अ.तथा तहसिलदार महसुल, नायब तहसिलदार अनिकेत पालेपवाड ना.त.उ.वि.अ.का. परभणी. एम.ए.क्षीरसागर ना.त.म.1, गणेश चव्हाण ना.त.म.2, श्रीमती अनिता वडवळकर ना.त. निवडणूक, विष्णू पकवाने ना.त.सं.गा. यो.ग्रामीण, दिपक नागरगोजे पुरवठा निरिक्षण अधिकारी व नोडल अधिकारी sveep श्री गणेश शिंदे हे उपस्थित होते. सदर प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी निवडणूक विभाग त उपविभागीय अधिकारी कार्यीलय, परभणी व तहसिल कार्यलय परभणी यांनी परिश्रम घेतले. ( छाया- उत्तम बोरसुरीकर)