परभणी ( प्रतिनिधी) शहर महानगर पालीकेच्या वतीने जिल्हा शालेय स्पर्धा वय गट 14-17-19 45 स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत 2725 विद्यार्थ्यानी भाग घेतला. शहरातील 80 शाळेच्या विद्यार्थ्यानी भाग घेतला.
मनपाच्या वतीने स्टेडियम मैदान श्री शिवाजी महाविद्यालय, ज्ञानोपासक महाविद्यालय,डॉ. झाकीर हुसैन , बॅडमिंटन हॉल, सिटीक्लब , न्यु. ज्योर्तिगम इंग्रजी शाळा अशा शाळेत स्पर्धा घेण्यात आल्या यात आज दि. 26 रोजी मनपाच्या मुख्य कार्यालयात जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये 150 विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला होता.
या स्पर्धेसाठी आयुक्त धैर्यशील जाधव यांनी शहरातील शालेय खेळाडुंसाठी याही असे सहकार्य करणार तसेच मनपाच्या वतीने ग्राउंड उपलब्ध करून देणार असे स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी सांगीतले.
कॅरम स्पर्धेचे उदघाटन आस्थापना विभाग प्रमुख मंजुर हसन याच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यस्थानी क्रीडाविभाग प्रमुख राजकुमार जाधव प्रमुख अतिथी म्हणून लेखा विभागाचे विजय डंबाळे, मोहम्मद महेमुद ,डॉ. अनिल मेड, मंगेश इंगळे प्रकाश पंडीत, महेश काळदाते. कत्पील देशमुख शेख अनवर, सौ. अनिता इनामदार, निलेश राठोड यांचा सत्कार मनपाच्या वतीने करण्यात आला. सदरी स्पर्धा ह्या सायकाळी 6.00 पर्य सुरु होत्या. ( छाया – उत्तम बोरसुरीकर)