परभणी,(प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी दि.28 ऑक्टोबर ते दि.3 नोव्हेंबर या कालावधीमध्ये दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
त्या अनुषंगाने शासन निर्णयानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग परभणीच्या कार्यक्षेत्रामध्ये विविध कार्यकमांचे आयोजन करण्यात आले आहे.
हे सर्व कार्यक्रम सत्यनिष्ठेच्या संस्कृतीच्या माध्यमातुन राष्ट्र समृध्दी या संकल्पनेनुसार पार पाडण्यात येणार आहेत. महाराष्ट्र शासन निर्णयानुसार दि.28 ऑक्टोबर रोजी सकाळी सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालयामध्ये भ्रष्टाचारनिर्मुलनाबाबत शपथ घेवुन राज्यपाल व मुख्यमंत्री यांनी दक्षता जनजागृती सप्ताहानिमीत्त दिलेल्या संदेशाचे वाचन करून जनजागृतीला सुरूवात करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग परभणी कार्यक्षेत्रामधील सर्व तालुक्याचे ठिकाणे, सार्वजनिक ठिकाणी, गर्दीचे ठिकाण, बाजार, बसस्थानक, रेल्वे स्थानक इत्यादी ठिकाणी भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत पोस्टर्स व बॅनर लावण्यात येणार आहेत.
भ्रष्टाचार निर्मुलन करण्यासाठी प्रत्येक शासकीय, निमशासकीय तसेच शासन अनुदानीत संस्था या ठिकाणी लाच घेणे अथवा लाच देणे गुन्हा आहे असे फलक नागरिकांना दिसतील अशा दर्शनी भागामध्ये लावले जाणार असुन त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग परभणी कार्यालयाचा पत्ता, दुरध्वनी क्रमांक, टोल फ्रि क्रमांक व ईमेल आयडी नमुद केला जाणार आहे. तसेच सर्व शासकीय कार्यालयांकडून देखील दक्षता सप्ताह 2024 चे आयोजन करून व्यापक जनजागृती केली जाईल तसेच विविध प्रसारमाध्यमाद्वारे भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
भ्रष्टाचार निर्मुलनाच्या कामात जनतेला सहभागी करून घेण्याकरीता त्यांच्याकडे भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणा-या लोकसेवकाविरूध्द तक्रार असल्यास नागरिकांनी शनिवार बाजार, नानलपेठ परिसरातील अॅन्टी करप्शन ब्युरो कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन आले आहे.
०२४५२-२२०५९७ टोल फ्री १०६४
ऑनलाईन तक्रार अॅप्लीकेशन acbmaharastra.net
पोलीस उप अधीक्षक 9850483337
spacbnanaded@mahapolice.gov.in
dyspacbparbhani@mahapolice.gov.in
Facebook: Acb परभणी
Twitter: @ACBPARBHANI
इंस्टाग्राम: acbparbhani
फेसबुक पेज: लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो, परभणी