परभणी (प्रतिनिधी) महाविकास आघाडी तसेच शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे परभणी विधानसभेचे आ. डॉ.राहुल पाटील हे मंगळवारी ( दि.29)राजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी यूवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची उपस्थितीत राहणार आहे.
शहरातील शनिवार बाजार मैदान येथून सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली चे आयोजन करण्यात आले आहे. अर्ज दाखल प्रसंगी खा. संजय जाधव, खा. फौजीया खान, आ. सुरेश वरपूडकर, माजी आ. विजय गव्हाणे यांच्यासह घटक पक्षातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.आ. डॉ. राहुल पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली. मंगळवारी सकाळी ११ वाजता शनिवार बाजार येथून रँली निघणार आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे रॅलीत सहभागी होणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे येणार आहेत. रॅली नंतर आयोजित सभेला ते संबोधित करणार आहेत. शहरासह विधानसभा मतदारसंघातील सर्व महाविकास आघाडीसह शिवसेना उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.