पालम ( प्रतिनिधी) राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने जनावरांना ( कानातील टॅग लावणे बंधनकारक केले आहे
केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानाचा भाग म्हणून भारतीय पशुधन प्रणाली लागू केली आहे. ही प्रणाली पशुधनासाठी सर्व प्रकारचे कान टॅगिंग रेकॉर्ड करते. त्यामुळं जनावरांची जन्म आणि मृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक औषध,लसीकरण, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क आणि जनावरांच्या खरेदी – विक्रीचे तपशील यासारखी माहिती यातून उपलब्ध होणार आहे. शिवाय आपत्ती काळात जनावर दगवल्यास अनुदान मिळवण्या साठी हा टॅग आवश्यक असणार आहे. जनावरांचे टॅगिंग नसल्यास शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही. त्यामुळं पशुपालकांना आपल्या जनावरांचे इअर टॅगिंग करुन घेणं आवश्यक आहे. त्यासाठी पशुपालकांनी आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.
पालम येथील श्री सद्गुरू बाळकृष्ण गोशाळा पालम येथे दि.25 रोजी सकाळी पशुवैद्यकीय दवाखाना पालम येथील कार्यतत्पर कर्मचारी अन्नरवाड समवेत सौरभ रोकडे आव्हाड
यांच्या वतीने गोशाळा पालम येथे सर्व गोधनास इयर टॅगींग करण्यात आले यावेळी गोवंशास कुठल्याही प्रकारची वेदना व दुखापत होऊ नये याची विशेषत: काळजी घेण्यात आली व गोशाळा येथील सर्वच गोधनास यशस्वीरित्या एयर टॅगींग प्रक्रिया पूर्ण करण्यात आली यावेळी संतोष जोशी तुकाराम ठाकरे भुजंग नावळे नरहरी लोखंडे अंकुश मोहिते गौरव कुलकर्णी यांच्या सहकार्याने एयर टॅगींग प्रक्रिया पूर्ण करण्यात आली
यावेळी गोशाळा चे सचिव अविनाश देविदासराव जोशी पालमकर यांनी पालम पशुवैद्यकीय दवाखान्याचे व कर्मचारी तथा उपस्थित गोसेवकांचे विशेष आभार व्यक्त केले
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


