परभणी,(प्रतिनिधी) : अवैधरित्या उत्पादित होणार्या गावठी दारू, त्याचप्रमाणे बनावट व परराज्यातून कर बुडवून येणार्या देशी व विदेशी दारू विरुध्द पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाद्वारे संयुक्तपणे कारवाई करण्यात येणार आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. श्री विजय सूर्यवंशी यांनी नांदेड परिक्षेत्रातील उत्पादन शुल्क विभागाच्या कामकाजाचा आढावा नांदेड येथील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात घेतला. याप्रसंगी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी मागील दोन महिन्यांत दारूबंदी संदर्भात पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. नांदेड परिक्षेत्रातील पोलिसांनी मागील दोन महिन्यात, गावठी दारूचे गाळप रोखण्याकामी एकूण 5 मासरेड आयोजित केल्या होत्या. यात, पोलिसांनी विविध ठिकाणी छापेमारी करून, गावठी दारू गाळणार्या इसमांविरुद्ध एकूण 1 हजार 34 केसेस केल्या असून, 59 लाख 69 हजार 519 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती दिली.
तेलंगणा व कर्नाटक राज्यांच्या सीमेवर पोलीस व उत्पादन शुल्क विभागाचे चार संयुक्त तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. या तपासणी नाक्यांवरून परराज्यातील अवैधपणे व कर बुडवून येणारी दारू राज्यात येऊ नये, म्हणून प्रयत्न होणार आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक प्रक्रिया प्रलोभन विरहित होण्याकरिता, हातभट्टी गाळप करणारी ठिकाणे, बनावट दारू बनविणारे अड्डे यांच्यासह विविध प्रकारची दारू राज्यात आणणारी रॅकेट्स उध्वस्त करण्यासाठी नांदेड परिक्षेत्रातील पोलीस व उत्पादन शुल्क विभाग संयुक्तपणे कारवाई करणार असल्याचे आयुक्त सूर्यवंशी यांनी सांगितले.
याप्रसंगी, उत्पादन शुल्क विभागाचे सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त तडवी, अधीक्षक गणेश पाटील, केशव राऊत, आदित्य पवार यांच्यासह जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांची उपस्थिती होती.
Thursday, May 21
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा पुन्हा भगवामय करणार – आमदार डॉ राहुल पाटील यांचा निर्धार : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
- चाळीशीत वाढताहेत ‘हार्ट अटॅक’चे प्रमाण; आर.पी. हॉस्पिटलचा ‘TMT’ उपक्रम अवघ्या ३०० रुपयांत
- नानलपेठ पोलीस ठाण्यात २४ बेवारस दुचाकी वाहनांचा २८ मे रोजी जाहीर लिलाव
- पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती मृत्यु प्रकरणाचा जलद गतीने तपास करा; वसमत रोडवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची पत्रकारांची मागणी
- राष्ट्रीय स्पर्धेसाठी डॉ. पंकज खेडकर यांची परीक्षक म्हणुन निवड* ; पुण्यात रंगणार ‘भारत उत्सव २०२६’चा सोहळा; लोककला आणि अभिनयाचा अविष्कार
- ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती निधन ; गंगाखेड येथे अंत्यसंस्कार
- निर्वाचित पक्ष, गट व अपक्षांसाठी महत्त्वाची सूचना: ११ मेपूर्वी आघाडी नोंदणी आवश्यक
- परभणीत 7 मे रोजी गुरव समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा व मौंजी संस्कार कार्यक्रम


