परभणी (प्रतिनिधी) येथील राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये दिनांक 22 ऑक्टोबर 2024 रोजी शारदा महाविद्यालय परभणीचे नवनियुक्त प्राचार्य डॉ.बबनराव पवार यांचा सत्कार व अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रमुख कार्य करणाऱ्या ‘विवेक वाहिनीचे’ उदघाटन असा दुहेरी कार्यक्रम पार पडला.
राजर्षी शाहू महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये विवेकदृष्टी जागृत व्हावी व प्रत्येक घटनेमागचा कार्यकारणभाव वाढीस लागावा या उद्देशाने ‘विवेक वाहिनीच्या’ शाखेचे उद्घाटन करण्यात आले. पुढे या कार्यक्रमाचे उदघाटक शारदा महाविद्यालय परभणी चे नवनियुक्त प्राचार्य डॉ.बबनराव पवार यांचा महाविद्यालय व संस्थेच्या वतीने प्राचार्य डॉ. विठ्ठल घुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर विवेक वाहिनीचे विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कु. श्रद्धा खनपटे, सय्यद अखेद, कु. प्रतीक्षा हातागळे, मुकुंद चोखट यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमास उदघाटक म्हणून प्राचार्य डॉ. बबनराव पवार हे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ‘विवेक वाहिनीचे’ जिल्हाध्यक्ष श्री सहादू ठोंबरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ.विठ्ठल घुले यांनी भुषविले. याप्रसंगी विचार मंचावर प्रा.डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, प्रा.डॉ.अरविंद हनुमंते यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. कल्याण गोपनर यांनी केले तर प्रा.डॉ. रमेश शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता विवेक वाहिनीचे सह-समन्वयक प्रा. डॉ. हनुमंते ऐ.एच., प्रा.डॉ. गोपनर के.एस,श्री भगवान गाडगे, रंगनाथ पोहरे यांनी परिश्रम घेतले.