पाथरी,(प्रतिनिधी) : पाथरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्रीमती निर्मला उत्तमराव विटेकर यांनी गुरुवारी (दि.24) उमेदवारी अर्ज दाखल केला.
महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीमती विटेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्या संदर्भात हालचाली सुरु केल्या. गुरुवारी गुरुपुष्यामृताचा योग साधून पाथरी तहसील कार्यालयात दुपारी 2 वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांचे समवेत आमदार राजेश विटेकर, माजी आमदार हरिभाऊ लहाणे, भारतीय जनता पार्टीचे नेते डॉ. केदार खटींग, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड, पाथरी कृउबाचे सभापती अनिल नखाते, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या श्रीमती भावना नखाते, सुभाष आंबट पाटील यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.


