पालम (प्रतिनिधी ) मराठवाड्यातील एकमेव बेट म्हणुन ख्याती असणारे परभणी जिल्ह्यातील पालम या तालुक्यातील निसर्गरम्य जांभूळ बेट येथे मागील कित्येक वर्षापासून पर्यटक हे येथील निसर्गरम्य वातावरण तथा येथील जोपासलेली विविध वृक्ष येथील गोदावरी पात्रात बोटिंगद्वारे पोचणे ही पर्यटकांच्या साठी एक पर्वणीच आहे
येथे चारही बाजूंनी जांभळाच्या झाडांची गर्दी व मोरांचे थवे आणि इतर पक्ष्यांची वर्दळ पूर्वी पासून होती ठिकाणी पर्यटकांसाठी आवश्यक सुविधांचा अभाव मागील काही वर्षांपासून जांभूळबेट संवर्धन समिती चे अध्यक्ष कृषीभूषण कांतराव काका झरीकर यांच्या मार्गदर्शना मागील काही वर्षापासून मराठवाड्यातील हे एकमेव असणारे निसर्गरम्य जांभूळबेट या बेटाचा विकास व्हावा या उद्देशाने विकास होणे आवश्यक आहे पालम पासून ५ कि. मी. अंतरावर असलेल्या निसर्गरम्य जांभूळबेट या भागाचा विकास झाल्यास पालम तालुका पर्यटन वाढीमुळे विकासाच्या प्रवाहात येईल
पालम तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातील असणारे जांभूळबेट येथे मागील काही वर्षांपासून जांभूळ बेटावर मोठ्या वृक्षांची लागवड सन -2022 साली करण्यात आली व संगोपन करण्यात येत आहे लोकसहभागातून जांभूळ बेट संवर्धन मोहिम सुरू असून आजपर्यंत बेटाच्या संवर्धन कार्यात
1बेटावर 3000 जांभूळ व ईतर पर्यावरण पूरक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे व त्यांचे संगोपन सुरू आहे.
बेट स्वच्छता कार्यक्रम सातत्याने सुरू आहे पर्यटकांना बेटावर जाणे सुलभ व्हावे यासाठी *लोकसहभागातून एक बोट खरेदी केली* असून अत्यन्त कमी दरात पर्यटकांसाठी उपलब्ध आहे.
बेटावरील हनुमान मंदिर परिसरातील शेडवर कृषिभूषण कांतराव काका यांनी *पत्रे व इतर साहित्य* उपलब्ध करून दिलेले आहे.
झाडांना पाण्याची सोय व्हावी यासाठी *मोटार पाईपलाईन* तसेच सोलार लाईट ची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
वरील सर्वकार्य संवर्धन समितीच्या माध्यमातून सुरू आहे. रविवार दिनांक 3 जुलै 2022 रोजी बेटावर मोठ्या वृक्षांची लागवड वनभोजन कार्यक्रम येथे संपन्न झाली आहेत
जांभूळबेट पूर्ववत सुरू करण्यासाठी पूर्व तयारी उपाययोजना स्वरुप बोटीला कलरींग करणे व डासांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी फवारणी करण्यात आलेली आहे.
जांभूळबेट येथे पर्यावरण प्रेमी पर्यटकांनी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन जांभूळबेट संवर्धन समिती चे अध्यक्ष कृषी भूषण कांतराव काका झरीकर यांच्या वतीने करण्यात आले