परभणी ( प्रतिनिधी) बाल विद्या मंदिर हायस्कूल वैभव नगर विभागात दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचे सादरीकरण अर्थात *स्वप्नतरंग* हे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे सचिव माननीय डॉ. विवेकजी नावंदर सर,तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ॲड.अशोकजी सोनी साहेब होते.तसेच याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक अरुणजी बोराडे सर, उपमुख्याध्यापक श्आर.जी.तुम्मेवार पर्यवेक्षक.बी.के. कोपरटकर व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. सुनीता जाधव मॅडम व . सुरेशजी रवंदळे सर व वैभव नगर प्रशालेचे विभाग प्रमुख .प्रदीपजी रुघे सर व्यासपीठावर विराजमान होते.
याप्रसंगी मान्यवरांच्या शुभ हस्ते नटराज प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.आपले मनोगत व्यक्त करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष. विवेकजी नावंदर सर आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की *विद्यार्थ्यांच्या जीवनात कलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे बाल विद्या मंदिर हे अशा सर्व कलाकारांचे प्रमुख व्यासपीठ आहे त्यामुळेच आमची मान संपूर्ण महाराष्ट्रात उंचावली आहे* तर कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक मा.ॲडव्होकेट श्री.अशोकजी सोनी साहेब यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करून त्यांना योग्य मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी – नृत्य,नाट्य, संगीत,अभिनय, वेशभूषा इत्यादी विविध कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कु. शर्वरी आयस्कर, जीवीका मुडे,अनुष्का शिवलाड व राजश्री माने यांनी जल्लोषात केले.दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर थिम सादर केले तसेच भारतीय संस्कृतीला अनुसरून अनेक नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि अहवाल वाचन पर्यवेक्षक प्रदिप रुघे यांनी केले तर आभार प्रदर्शन.एस. एम.उखळकर यांनी केले या सर्व विद्यार्थ्यांना सांस्कृतिक विभागातर्फे सौ.आलेगावकर .रमाकांत पैंजणे सौ. गुडेवार ,सौ. देशमुख ,सौ.हाके ,सौ.बोरचाटे आणि सौ.कंधारकर .महेश दीक्षित यांचे सहकार्य लाभले याप्रसंगी.एस.डी. कुंडगीर .बी.एम. दंडवते,श्री.अजित देशपांडे, श्रीराम पतंगे,. प्रभाकर गमे, विशाल गायकवाड, सचिन वानरे,सौ.पैजणे सौ.पारडे इत्यादी सर्व शिक्षक वृंदांच्या मार्गदर्शन व निगराणीखाली हा कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगीभरपूर विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


