परभणी (प्रतिनिधी) आ.डॉ.राहुल पाटील यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या यशस्वीनी महिला मंचच्या वतीने महिलांसाठी गुरुवार दिनांक 1 मे रोजी सायंकाळी पाच वाजता अक्षदा मंगल कार्यालय येथे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गृह उद्योजिका तसेच महिला बचत गट यांच्यासाठी व्यासपीठ म्हणून पुढे आलेले यशस्विनी महिला मंच विविध उपक्रम राबवत आहे, महिलांना रोजच्या कामातून विरंगुळा म्हणून अनेक प्रकारचे मनोरंजन कार्यक्रम देखील या ग्रुपच्या माध्यमातून घेतले जात आहेत. डॉ.संप्रिया पाटील यांच्या संकल्पनेतून यशस्विनी महिला यांच्या वतीने यंदा अक्षदा मंगल कार्यालयात गुरुवारी सायंकाळी 5 वाजता न्यू होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे,
यावेळी होम मिनिस्टरचे सादरीकरण सिने अभिनेते क्रांतीनाना मळेगावकर आणि बालगायिका सह्याद्री मळेगावकर हे करणार आहेत. यावेळी महिलांसाठी विविध स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. यामध्ये विजेत्या महिलांना फ्रिज,मिक्सर सह भरपूर विविध आकर्षक पारितोषिके दिली जाणार आहेत. महिलांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यशस्विनी महिला मंचच्या संस्थापक अध्यक्षा डॉ.सौ.संप्रिया पाटील यांनी केले आहे.