परभणी ( प्रतिनिधी) येथील अक्षदा मंगल कार्यालयात बुधवार, दि.२३ आॅक्टोबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ता,पदाधिकारी संवाद मेळावा पार पडला.
यावेळी खा.संजय जाधव आ.डॉ. पाटील, शिवसेना सह संपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले यांच्यासह सर्व आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खा. संजय जाधव म्हणाले की, परभणी विधानसभा मतदारसंघात आम्ही मागील ३० वर्षांपासून हा शिवसेनेचा गड अभेद्य ठेवला आहे. यापुढे देखील तो अभेद्य राहणार यात शंका नाही. आ. डॉ.पाटील यांनी मागील १० वर्षांमध्ये परभणी मतदार संघात लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे तर प्रत्येक घरातील, कुटुंबातील सदस्य म्हणून काम करत आहेत. त्यामुळे जनतेच्या मनामनात आ.पाटील वसले आहेत. सामान्य शिवसैनिकांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे. निष्ठावंतांना न्याय मिळतो आणि हा न्याय ठाकरे यांची शिवसेनाच देऊ शकते हे सिद्ध झाले आहे. आम्हाला देखील शिवसेना फुटी नंतर मोठी आमिषे आली होती. परंतु आम्ही आमिषाला बळी न पडता निष्ठावंत राहिलो म्हणून मायबाप जनतेचा आशिर्वाद सदैव आमच्या पाठीशी आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आ. पाटील यांचा विजय निश्चित आहे. कार्यकर्त्यांनी त्यांचे मताधिक्य वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. बुथनिहाय दिलेली जबाबदारी योग्य पार पाडावी. १०० टक्के मतदान कसे होईल याकडे लक्ष द्यावे असे देखील खा. जाधव यांनी स्पष्ट केले.
यावेळीआ. पाटील म्हणाले यांनी कार्यकर्त्यांनशी संवाद साधताना म्हणाले की, मी जनतेचा सेवक म्हणून मागील १० वर्षापासून कार्यरत आहे. यापुढे देखील अशीच सेवा अविरत सुरू राहील. कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मला जे प्रेम दिले त्याची मी परतफेड कधीच करू शकणार नाही अशा भाऊक शब्दात आ. पाटील यांनी सर्व कार्यकर्ता पदाधिकाºयांचे आभार मानत यापुढे देखील अशीच साथ देण्याचे आवाहन केले. यावेळी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, दलित आघाडी, शिक्षक सेना व सर्व सलग्न संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येन उपस्थित होते.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


