परभणी(प्रतिनिधि) चार विधानसभा मतदार संघात निवडणूक संदर्भात स्वीप पथकाच्या वतीने युवक, महिला, वयोवृद्ध, नवमतदार, भावी मतदारांमध्ये ग्रामीण आणि शहरी भागात जावून मतदान जनजागृती करण्यात येणार आहे.त्या मतदान जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून मंगळवार (दी.22) रोजी उद्घाटन करण्यात आले.
यावेळी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे,तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे,विज्ञान सूचना व तंत्रज्ञान अधिकारी सुनील पोटेकर,जिल्हा स्वीप नोडल अधिकारी तथा जेष्ठ अधिव्याख्याता गणेश शिंदे
नायब तहसीलदार रेड्डी, दत्ता गिणगीने,आदिंची उपस्थिती होती.तसेच यावेळी स्वीप पथकाचे सदस्य प्रवीण वायकोस, अरविंद शहाणे, त्र्यंबक वडसकर, हनुमंत हंबीर, रामप्रसाद अवचार, प्रा.भगवान काळे,
अतुल सामाले, शिवाजी कांबळे,प्रा.प्रवीण लोणारकर ,
सुधाकर गायकवाड, प्रफुल्ल शहाणे, ज्ञानेश्वर पाथरकर, मोहन आल्हाट,विशाल पाटिल, प्रसन्न भावसार,महेश शेवाळकर,वैभव पुजारी,बबन आव्हाड,का.रा.चव्हाण, शिवाजी वाघमारे, सुनील वाघ आदिंची उपस्थिती होती.स्वीप पथकाच्या माध्यमातुन लघुनाटिका, पथनाट्य, गीता,संगितातुन नवमतदार, युवक, महिला, पुरुष,वयोवृद्ध व्यक्तिमध्ये मतदान संदर्भात जनजागृती करत मतदान टक्केवारी वाढन्यासाठी मदत होणार आहे.
(छाया-उत्तम बोरसुरीकर)