परभणी ( प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे भोगाव साबळे येथील गाळमुक्त धरण, गाळ मुक्त शिवार अभियाना अंतर्गत झालेला भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्या कडे ग्रामस्थांनी केली. महात्मा ज्योतीबा फुले खोपडी यवतमाळ या सेवाभावी संस्था मार्फत दिनांक 18 में 2023 ते 29 में 2023 या कलावधीत मोजे भोगाव (साबळे) बेबील शेक-यांना तलावातील गाळ काढण्यासाठी अनुदान देण्यात आले होते. परंतु संबंधित ग्रामपंचायत यांनी शेतकऱ्याशी पन्नास टक्के रक्कम तुला व पन्नास टक्के रक्कम मला असा करार करून गाजर टाकलेल्या 55 लोकांची बनावट यादी तयार केली. संबंधित एजन्सी व जलसंधारण अधिकारी बांनी फक्त 10 दिवस जे सी बी चालवून 50 दिवसाचे बिल उचलून…
Author: Lok Sanchar
परभणी (प्रतिनिधी) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे , उपसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर कार्यालय , जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी यांच्या द्वारे विभागस्तरीय युवा महोत्सवाचे उद्घाटन बी रघुनाथ सभागृह परभणी येथे उत्साहात संपन्न. या प्रसंगी परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे व जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, राज्य युवा पुरस्कारार्थी काजल भुसारे , प्रा. डॉ सुरेश शेळके , डॉ. सुरेश हिवाळे डॉ.संतोष वाकडे डॉ. श्रीकांत पेंडलवार, मिलिंद बामणीकर, श्रीमती सुनंदा दिगोलकर डॉ. पंकज खेडकर , रविकुमार पंडित श्रीमती लक्ष्मी लहाने अब्दुल कुरेशी श्रीमती भाग्यश्री जोशी श्रीमती पुनम मारवा श्रीमती सरोज देशपांडे आदि उपस्थित होते. विभागस्तरीय युवा महोत्सवामध्ये सांस्कृतिक…
परभणी, (प्रतिनिधी) दिनांक ०६ डिसेंबर रोजी एसबीआय आरसेटी, परभणी येथे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी भेट दिली व आरसेटी कामकाजा विषयी माहिती जाणून घेतली. आरसेटीमध्ये सुरु असलेल्या ब्युटी पार्लर प्रशिक्षणास त्यांनी भेट दिली यावेळी त्यांनी प्रशिक्षणातून उत्तम रोजगारक्षम माणसे घडवीत, अशी अपेक्षा व्यक्त केली , या वेळी संस्थेचे काही यशश्वी उदयोजक देखील उपस्थित होते. त्यांचा जिलाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमासाठी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थाक उदय कुलकर्णी यांची उपस्थिती होती. संस्था संचालक जितेंद्रसिंह कुशवाह यांनी संस्थेच्यावतीने पुष्पगुछ देऊन जिलाधिकारी रघुनाथ गावडे यांचा सत्कार केला. कार्यक्रमास जिल्हा अग्रणी कार्यालयाचे योगेश गुंडाळे, आरसेटी स्टाफ मनीषा कदम, मंगेश कोमटवार, संभाजी हनवते…
परभणी (प्रतिनिधी) परभणी येथील आरपी हॉस्पिटल येथे आर पी हॉस्पिटल व मेडीकल कॉलेज आणि मुंबईतील टाटा कर्करोग संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुसज्ज व अत्याधुनिक कर्करोग निदान व उपचार केंद्र सुरू होणार आहे अशी माहिती आमदार डॉ.राहुल पाटील यांनी दिली. कर्करोग निदान व उपचारासाठी रुग्णांना मुंबईत टाटा रुग्णालयात जावे लागते, परंतु तेथे दोन ते तीन महिने तपासणीमध्ये वेळ जातो, त्यामुळे कर्क रोगाचा आजार बळावतो उपचारास वेळ मिळत नाहीत म्हणून मराठवाड्यातील रुग्णांसाठी आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या पुढाकारातून आर पी हॉस्पिटल येथे कर्करोग रुग्णांसाठी निदान व उपचार केंद्र सुरू करण्यात येणार आहे, मुंबईतील टाटा कर्करोग संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हे…
पालम (प्रतिनिधी) राज्यातील कृषि क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलदगतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरीता केंद्र शासनाची ग्रीस्टॅक योजना राज्यात राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी दि. १६ डिसेंबर २०२४ पासून पालम तालुक्यातील प्रत्येक गावात सर्व शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) तयार करण्याकरीता मोहीम राबविण्यात येणार आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री), शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच (क्रॉप सोन रजिस्ट्री) व शेतांचे भू संदर्भिकृत (जिओ रेफरन्स लँड पार्सल) यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करणे व सातत्याने अद्ययावत करणे. राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र राज्य शासनाद्वारे राबविण्यात…
परभणी(प्रतिनिधी) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तर, विभाग स्तर, राज्यस्तर स्पर्धा पार पडल्या यामध्ये खो-खो, जिम्नास्टिक, उशु ,स्क्वॅश, कुस्ती, टेबल टेनिस ,आर्चरी, कराटे ,सायकलिंग, बुद्धिबळ अशा विविध क्रीडा स्पर्धांमध्ये बाल विद्यामंदिर हायस्कूल वैभव नगर शाखेच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केलेआहे. यामध्ये टेबल टेनिस या खेळामध्ये चि.अनुज कवठेकर , अवधूत कोठेकर या खेळाडूंनी राज्य स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त केलेआहे आणि चि.अनुज कवठेकर याची गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेसाठी १४ वर्ष वयोगटातील महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.तर राज्य टेबल टेनिस स्पर्धेत चि.श्रीपाद कोठेकर याची निवड झालेली आहे.…
परभणी (प्रतिनिधी) महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज भारतीय जनता पार्टी महानगर परभणी च्या वतीने स्टेशन रोड परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुख्य पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी राजेश भैय्या देशमुख जिल्हाध्यक्ष भाजपा महानगर परभणी, प्राचार्य रमाताई शेजावळे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनुसुचित जाती मोर्चा,उमेश शेळके,रितेश जैन जिल्हा उपाध्यक्ष, संजय रिजवानी सरचिटणीस ,जिल्हा सचिव डॉ मनोज पोरवाल , दिनेश नरवाडकर, प्रभावती अन्नपूर्णे, भालचंद्र गोरे मंडळाध्यक्ष,ओम मुदिराज, जिल्हाध्यक्ष अनुसूचित जमाती मोर्चा, माऊली कोपरे सोशल मीडिया जिल्हा संयोजक, विजया कातकडे, किशन् सिंग टाक, प्रा.अरुण शेजावळे, अनिल रेंगे, उमेश रोडे, अब्दुल भाई यासह आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती…
पालम (प्रतिनिधी) तालुक्यात महापरिनिर्वाण दिना निमीत्त आदरांजली अर्पण करण्यात आली. पालम येथिल बौद्ध विहार येथे महामानव बोधिसत्व भारतरत्न परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आला या वेळी सखारामजी हतिअंबिरे,वैजनाथ हतिअंबिरे, गणेश हतिअंबिरे,निवृती हतिअंबिरे, सुदाम लोढे, शिध्दार्थ व्हावळे,भगवाण येवले यांच्या सह मान्यवर उपस्थित होते. *रावराजुर ग्राम पंचायत येथे महापरिनिर्वाण दिना निमीत्त अभिवादन* विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले त्या प्रसंगी सरपंच सचिन साळवे,माधवराव अडकीने,मघुकर शिंदे,अप्पा शिंदे,माधवराव गोबाडे,गंगाधर खंदारे व ग्रा.पंचायतचे सर्व कर्मचारी होते. *पालम येथिल माधवराव पाटील महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली* पालम येथिल माधवराव पाटील महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब…
परभणी ( प्रतिनिधी) महारष्ट्रचे मुख्यमंत्री म्हणुन आज गुरुवारी ना. देवेंद्र फडणवीस यांनी आजाद मैदान येथे शपथ घेतली. त्यानिमित्त जिंतूर रोडवरील आ. मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या कार्यालयात भजपा जिल्हा उपाध्क्ष संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली बंड फटाके व पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. यावेळी विश्वास करहाले, सतीश धानोरकर, मकरंद मांडे, वेंकटेश कुळकर्णी, मनोज देशमुख, धांजय देशपांडे, संतोष चाकोते, संजय जोशी, हनुमान सोमवंशी, पोंढे मामा, मुरली चव्हाण, सुप्रिया मांडे, जयश्री जोशी, अनिता कुळकर्णी आदि उपस्थित होते.
परभणी (प्रतिनिधी) गुरुवार 5 डिसेंबर रोजी बाल विद्यामंदिर हायस्कूल च्या नानल पेठ व वैभव नगर शाखेत भव्य शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन नानल पेठ विभागात बाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष डॉ. एन.ए.झरकर साहेब व वैभव नगर विभागात बाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे सन्माननीय सचिव डॉ.विवेक नावंदर साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण बोराडे, उपमुख्याध्यापक आर.जी.तुम्मेवार, पर्यवेक्षक पी.व्ही. रुघे, बी.के.कोपरटकर व पर्यवेक्षिका सौ.एस.एम. बोके उपस्थित होत्या.या प्रदर्शनात वर्ग सहावी ते आठवीच्या गटामधून 102 प्रयोग व वर्ग नववी ते बारावीच्या गटातून 25 प्रयोग असे एकूण 127 प्रयोग मांडण्यात आले होते.या प्रदर्शनाचे परीक्षण कनिष्ठ…

