परभणी ( प्रतिनिधी) ग्रंथ वाचक भानुदासजी साबळे, पंडितराव प्रधान, गौतम मुंडे, विजय लोखंडे, दशरथ झिंझाडे, नामदेवराव गायकवाड, सखाराम जोंधळे, आशाताई साबळे, मंगल भक्ते,सुजाता नगर येथे बुद्धधम्म ग्रंथ वाचन समाप्ती कार्यक्रम संपन्न .
कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदनेने करण्यात आली.
सुजाता बुद्ध विहारात मागील तीन महिन्यांपासून दररोज बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र धम्म ग्रंथाचे वाचन करण्यात आले.या ग्रंथाचे वाचन मा. बौद्धाचार्य भानुदासजी साबळे गुरुजी व श्रीमती रेखाताई रगडे यांनी केले डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने ग्रंथ वाचन कर्ते यांचा यथोचित सन्मान करण्यात आला
तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सौ.पुष्पाताई सुरेशराव सदावर्ते आणि सोनकांबळे बाबा उपासक श्री.ज्ञानोबा गायकवाड यांचा ही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गौतम मुंडे यांनी केले ते आपल्या भाषणात म्हणाले की सुजाता महिला मंडळ हे परभणी जिल्ह्यातील उत्कृष्ट महिला मंडळ आहे अत्यंत सुरेल आवाजात बुद्ध वंदना म्हटल्यामुळे बुद्ध विहार व परिसरातील वातावरण मंत्रमुग्ध झाले होते.
सुजाता बुद्ध विहारात धम्म ग्रंथ श्रवण करण्यासाठी महिलांची संख्या दररोज मोठ्या प्रमाणात होती
या कार्यक्रमाच्या नंतर जयंती उत्सव समितीकडून सर्वांना सुरूची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रमाला सुजाता नगर व परिसरातील धम्म बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष व इतर पदाधिकारी दशरथराव झिंझाडे, पंडितराव प्रधान, देविदास गायकवाड, सखाराम जोंधळे,रामराव तालेवार, गौतम मुदावणे,एडव्हकेट राजपाल साबळे, निखिल मकरंद,विक्कि शिंदे, विशाल जोंधळे, शंकर कांबळे, रविंद्र प्रधान, सुजाता महिला मंडळ स्नेह युवक मित्र मंडळ इत्यादी कार्यक्रमाचे आभार पी टी प्रधान यांनी मानले लोकनेते विजयराव वाकोडे यांचे वडील कालवश सेवा निवृत्त उपजिल्हाधिकारी दशरथराव वाकोडे यांना आदरांजली वाहण्यात आली व कार्यक्रम संपन्न झाला.आपला विश्वासू गौतम मुंडे अध्यक्ष सुजाता नगर जयंती उत्सव समिती सुजाता नगर परभणी
(छाया संजय घनसावंत)