Author: Lok Sanchar

परभणी ( प्रतिनिधी)  सोमवार दि 2 रोजी  परभणी शहरातील खानापूर येथे सिमेंट रोड व नाली बांधकामाचे भूमिपूजन पाथरी मतदारसंघाचे नवनिर्वाचित आ. राजेश  विटेकर यांच्या हस्ते संपन्न झाले. जिल्हा नियोजन विकास निधी अंतर्गत हि विकासकामे परभणी शहराचे प्रथम महापौर प्रताप भैय्या देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत. त्यामुळे खानापूर परिसरातील नागरिकांना अंतर्गत दळणवळण करण्यासाठी चांगली सोय उपलब्ध होईल. बऱ्याच वर्षा नंतर खानापूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून व माजी नगर सेवक राजू शिंदे यांच्या पुढाकारातून विकास निधी उपलब्ध झाला आहे. खानापूर मध्ये 4 कोटी रुपयांचा विकास कामाचा शुभारंभ या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे औचित्य साधून पाथरी विधानसभा विजयाबद्दल खानापूर वासीयांच्या वतीने…

Read More

परभणी (प्रतिनिधी) येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात, पुशुपोषण व आहारशास्त्र विभागाचे प्राध्यापक तथा विभाग प्रमुख, डॉ. सुनीत वानखेडे यांना यावर्षीचा, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथील, सन्मानाचा आणि प्रतिष्ठित असा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, नागपूर येथे प्रदान करण्यात आला. नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय येथे पार पडलेल्या, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये, मापसूचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांच्या हस्ते सदरील पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव मोना ठाकूर मॅडम, विद्यापीठाचे अधिष्ठता डॉ. उपाध्याय, संचालक संशोधन डॉ. कुरकुरे, संचालक विस्तार शिक्षण डॉ भिकाने, यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा डॉ. सुनीत वानखेडे, हे गेल्या 23 वर्षापासून, पशुवैद्यकीय…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मंगळवारी (दि.03) परभणी शहरातून मोठी रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा समाजकल्याण अधिकारी एस.के. भोजने यांनी दिली. या रॅलीत सर्व दिव्यांगांच्या शाळा, कर्मशाळेतील विद्यार्थी व कर्मचारी सहभागी होणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 10 वाजता ही रॅली निघणार असून त्यास जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे हे हिरवी झेंडी दाखविणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, विसावा कॉर्नर, नारायण चाळ कॉर्नर, जिल्हा परिषद नूतन इमारत, महात्मा फुलेे पूर्णाकृती पुतळा, प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रिडा संकुल मार्गे या रॅलीचा जिल्हा क्रिडा संकुलात समारोप होणार आहे. यावेळी पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त धैर्यशिल जाधव यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

Read More

परभणी ( प्रतिनिधी) येथील जेष्ठ नागरिक रमेशराव बाळकृष्ण सोनवणे (वय ८४) यांचे दि. २ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता निधन झाले. उद्या मंगळवार दिनांक ३ रोजी सकाळी ठीक १० वाजता वैकुंठधाम स्मशानभूमी,परभणी येथे अंत्यसंस्कार होणार आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील अधिकारी राजू सोनवणे व अनिल सोनवणे यांचे वडील होत. दैनिक लोकसंचार परिवारातर्फे त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली.

Read More

परभणी,(प्रतिनिधी)- महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा- २०२४ ही परभणी मुख्यालयातील 12 उपकेंद्रावर रविवार दि. 1 डिसेंबर, 2024 रोजी पार पडली. सकाळच्या सत्रात सकाळी 10 ते 12 वाजता  1987 विध्यार्थी उपस्थित तर 1020 अनुउपस्थित होते तर  दुपारच्या सत्रात 1972 उपस्थिती तर 1035 विध्यार्थी अनुपस्थिती होते शहरातील 1) ज्ञानोपासक महाविद्यालय, जिंतूर रोड, परभणी 2) कै. रावसाहेब जामकर माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय, जिंतूर रोड, परभणी 3) शारदा महाविद्यालय, सुभाष रोड, परभणी 4) बालविद्या मंदिर विद्यालय, नानलपेठ, शिवाजी पार्क, परभणी 5) श्री शिवाजी महाविद्यालय (ग्राऊंड फ्लोअर), वसमत रोड, परभणी 6) एन.व्ही.एस.मराठवाडा हायस्कूल, शिवाजी नगर, वसमत रोड, परभणी 7) गांधी विद्यालय, कृषी…

Read More

पालम (प्रतिनिधी) आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांना मंत्रीपद मिळावे म्हणून पालम तालुक्यातील भोगावं येथील पवित्र देवस्थान मारोती मदिरात महाभिषेक करण्यात आला. या वेळी आमदार गुट्टे काका मित्र मंडळ पालम तालुका युवाध्यक्ष भगवान सिरस्कर,वाडीखुर्द चे उपसरपंच चंद्रकांत गायकवाड, रामराव देशमुख, रासपचे तालुका उपाध्यक्ष राहुल शिंदे,शामराव काळे, कृ.उ.बा.स.चे संचालक,माधवराव नळदुर्गे, कौरव मोरताटे,बालाजी ढगे, खंडु लांडे, पांडुरंग दिवटे,गोपाळ पातळे, नारायण हाके, शिवाजी कराळे, विष्णु कराळे,केरबाजी नळदुर्गे, दिलीपराव भस्के लक्ष्मण पवार गजानन भस्के आदी कार्यकर्ते उपस्थित.

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी नूतन विद्या समितीद्वारे कै. ह.ब. दळवी स्मृतिदिनानिमित्त 5 डिसेंबर रोजी विभागीय शालेय पातळीवरील वक्तृत्व स्पर्धा परभणीत आयोजित करण्यात आल्या आहेत. नूतन विद्या समितीच्या शिवाजी नगरातील मराठवाडा हायस्कूलच्या रुद्रावतार मदनलाल धिंग्रा सभागृहात 5 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता या वक्तृत्व स्पर्धांना प्रारंभ होणार आहे. यात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी वर्ष, मराठी आमची गौरवशाली राज्यभाषा व गोमाता-राज्यमाता हे तीन विषय स्पर्धकांसाठी असणार आहेत. प्रथम विजेत्यास 2001, द्वितीय 1501 तर तृतीय विजेत्यास 1001 तर उत्तेजनार्थ 501 रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. स्पर्धा आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी असून प्रत्येक विद्यार्थ्यास 5 मिनीटे वेळ दिला जाणार आहे. एका शाळेतून दोनपेक्षा अधिक…

Read More

परभणी (प्रतिनिधी) : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या परभणी शाखेतर्फे रविवारी तालुक्यातील श्रीक्षेत्र त्रिधारा या ठिकाणी भव्य आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. अमावस्येनिमित्त येथील ओंकारनाथ मंदिरात दर्शनाकरीता येणार्‍या हजारो भाविकांकरीता हे शिबीर प्रामुख्याने आयोजित करण्यात आले असून सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. तसेच अवयवदानाविषयी जनजागृती व रक्तदानही केले जाणार आहे. भाविकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यार्थी परिषदेने केले आहे.

Read More

संविधानातील विचार व मूल्यांच्या संरक्षणासाठी भारत जोडो अभियानचे प्रशासनास निवेदन परभणी(प्रतिनिधी) पुणे येथील फुले वाड्यामध्ये 28 नोव्हेंबरपासून ज्येष्ठ सामाजिक नेते डॉ. बाबा आढाव यांनी तीन दिवसीय आत्मक्लेश उपोषणास सुरुवात केली असून या उपोषणाला पाठींबा म्हणून परभणीमध्ये शुक्रवारी (दि.२९) एक दिवसीय उपोषण करत भारत जोडो अभियानकडुन जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सत्ता, संपत्ती जात व धर्मद्वेषाआधारे दररोज लोकशाहीचे वस्त्रहरण होत असून या विरोधामध्ये डॉ.बाबा आढाव व त्यांच्या समर्थकांनी पुणे फुलेवाडा येथे महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिनांक 28 नोव्हेंबरपासून तीन दिवसीय आत्मक्लेश उपोषण सुरू केले आहे. शाश्वत कायदा न करत जनतेला भुलविणाऱ्या योजना आणत,…

Read More

पालम (प्रतिनिधी) दि.30 रोजी पालम तहसिल कार्यालय येथे रब्बी ई-पिक पाहणी बाबत सहायक यांचे प्रशिक्षणी ठेवण्यात आले होते त्यात पालम तहसिल कार्यालयच्या सभागृहमध्ये पालम तहिसलदार कैलासचंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शना खाली नायब तहसिलदार आर.एन.पवळे यांनी मास्टर ट्रेनर भाऊसाहेब चाळक व रमेश बनसोडे यांच्या कडुन सर्व उपस्थीत ग्राम महसुल अधिकारी, सहायक यांना ई-पिक पाहणी बाबत प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षणास पालम तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व तलाठी व पालम तलाठी संघटना अध्यक्ष कैलास आगळे व महसुल सहायक शेख इस्माईल, महसुल सेवक माधव कांबळे ईत्यादी उपस्थित होते. सदर प्रशिक्षणात शेतक-यांनी दिनांक-1 डिसेंबर 2024 पासुन रब्बी हंगामातील ई-पिक पाहणी मोबाईल अँपवर नोंदणी करावी, तसेच…

Read More