परभणी ( प्रतिनिधी) ज्ञान ही वारसा हक्काने मिळणारी इस्टेट नाही ती अभ्यास व कष्ट करुनच मिळवावी लागते. जबाबदारी हि खुप परिक्षी घेत असते, जो निभावतो त्यालाच त्रास होतो. आणि जो त्रास सोसतो तो यश प्राप्त करत असतो असे प्रतिपादन पोलीस विभागात रुजु झालेल्या कु. पल्लवी पारवे हिने वडी येथे नागरी सत्काराला उत्तर देताना प्रतिपादन केले आहे.
पाथरी आगारातील चालक पदावर कार्यरत असणरे रघुनाथ पारवे यांची मुलगी कु. पल्लवी पारवे हीची निवड मुंबई येथील पोलीस विभागात झाली असुन तीने ९ महिन्याचे प्रशिक्षण पुर्ण करुन ती आज दिनांक २० ऑक्टोबर २०२४ रोजी आपल्या मुळ गावी वडी येथे तीचे आगमन झाले असते तीची गावातुन भव्य मिरवणुक काढुन स्वागत करण्यात आले.
आपल्या मुळ गावी वडी येथे आली असता. माझ गांव, माझे योगदान उपक्रमातील युवकानी, गावातील, ग्रामस्थानी तीची भव्य मिरवणुक वडी येथील महादेव नगर येथुन काढण्यात आली. गावातील महिलानी तीचे औक्षण करुन तीला पुढील सेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या मिरवणुकीची सांगता गावातील ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आली. गावच्या सरंपच व उपसरपंच यांच्या हस्ते तीच्या सह तीच्या पालकाचा सत्कार करण्यात आला.
वेगवेळया विभागातील भरती स्पर्धा परिक्षाची तयारी करणाऱ्या गावातील युवक युतीना प्रेरणा मिळावी म्हणुन गावातील शिक्षणप्रेमी नागरीकाडुन देखील तीचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी माझ गांव, माझे योगदान या उपक्रमातील युवक युवती, गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, कोतवाल, तंटामुक्ती समिती अध्यक्ष,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य यांच्या सह मोठया प्रमाणावर नागरीक उपस्थीत होते.
या पुर्वी देखील वडी गावातील रहिवाशी असलेले व वडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेले गावातील अनेक युवक व युवतीने प्रशासनातील वेगवेळया विभागात गरुप झेप घेतली आहे. त्यांचीच प्रेरणा घेउुन परिस्थीतीशी झगडुन, काळ अन वेळेशी चार हात करुन आई वडीलांच्या स्वप्न पुर्ण करण्यासाठी अर्थिक परिस्थीतीला न डगमगता मेहनत, जिदृ, चिकाटी आणि अभ्यासाच्या जोरावर राजेभाऊ काळे या उसतोड मजुराच्या मुलीने कु. पुनम राजेभाऊ काळे, हीची देखील महाराष्ट्र राज्य पोलीस खात्यात निवड झाली आहे. तसेच वडी येथील रहिवाशी असलेले व सध्या पाथरी आगारात बस चालक म्हणुन कार्यरत असलेले रघुनाथ पारवे यांची मुलगी कु. पल्लवी रघनाथ पारवे हिची देखील मुंबई येथे पोलीस खात्यात रूजू झाली आहे. तर श्री.कारभारी शिंदे या शेतकऱ्याची मुलगी कु. प्रियंका शिंदे यांची महाराष्ट्र महसूल विभागात तलाठी पदी निवड झाली आहे व त्या जळगांव येथे तलाठी पदी रुजू झाली आहे. तर श्री.कृष्णकुमार शिंदे (पंचायत समिती चालक) यांचा मूलगा चि. किरण शिंदे यांची महाराष्ट्र पाटबंधारे विभागात निवड झाली आहे व तो परभणी येथे पाटबंधारे खात्यात रूजु झाला आहे. श्री. तुकाराम हारणे यांचा मुलगा ज्ञानेश्वर हारणे यांची महाराष्ट्र आरोग्य विभागात निवड झाली आहे व ते पाथरी तालुक्यात आरोग्य खात्यात रूजु झाला आहे.