परभणी ( प्रतिनिधी) क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धा 14 वर्षाखालील मुले/ मुली या स्पर्धेच्या बक्षीस वितरणा कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती कविता नावंदे , प्रा.माधव शेजुळ सचिव परभणी जिल्हा कुस्ती असोसिएशन परभणी, श्री अण्णा डिगोळे, संचालक, राजे संभाजी तालीम केंद्र, श्री शरद कचरे आणि इतर अनेक मान्यवर, अधिकृत पंच व अधिकारी यांची उपस्थिती होती. जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे व प्रमुख पाहुणे लायन्स क्लबच्या श्रीमती पूनम मारवा व कुस्ती क्षेत्रातील अनेक मान्यवर यांनी खेळाडूंना प्रमाणपत्र व मेडल्स देऊन खेळाडूचा गौरव करण्यात केला.
या स्पर्धेकरिता राज्यातील जवळपास 200 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेचे जिल्हा क्रीडा संकुल, बॅडमिंटन हॉल, परभणी येथे आयोजन करण्यात आले होते .
14 वर्षाखालील मुले व मुलींच्या स्पर्धेचे आयोजन येथे करण्यात आले होते. मुलांच्या गटात कोल्हापूर, तर मुलींच्या गटात पुणे विभागाचे वर्चस्व राहिले.
राज्यातील 36 जिल्ह्यातून आठ विभागांमध्ये हे खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धा खेळण्यासाठी परभणी जिल्ह्यात उपस्थित होते त्यांच्यात लागलेली चुरस व स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे आहे. यावेळी विशेष बाब म्हणजे मुलींच्या गटात भरभरून प्रतिसाद आढळून आला आहे. पूर्वी कुस्ती या खेळामध्ये सर्व विभागातून प्रवेश येत नसत परंतु सध्याच्या काळात हे चित्र बदललेलं आढळून आले व सर्व विभागातून मुलींचाही सहभाग पूर्णपणे नोंदवला गेला होता. अशा या स्पर्धेचा मुलांचा व मुलींचा निकाल खालील प्रमाणे
सहभागी मुलींचा गट व त्यांच्या निकाल
30 किलो गट – समृद्धी सतीश पाटील (कोल्हापूर), गुंजन निलेश दमाहे (नागपूर ), कांचन अविनाश सानप (छत्रपती संभाजीनगर) साई गणेश साप्ते (लातूर)
33 किलोगट– वैष्णवी तात्याबा ढवळे (कोल्हापूर) श्रावणी नवनाथ चौगुले (पुणे) संशिका महावीर शर्मा (मुंबई), हर्षदा लहू सोनवणे (नाशिक )
36 किलो गट– ज्ञानेश्वर विश्वेश्वर शिंदे (पुणे),क नेहा बाबुराव ढवळे (मुंबई),यशोदा शिवाजी मोठे (कोल्हापूरल कृतिका रुपेश उपरकार (नागपूर)
39 किलो गट– गायत्री वृषेश्वर शिंदे (पुणे),वऋतुजा हनुमंत शिंदे ( छत्रपती संभाजी नगर), श्रावणी शरद शिंदे नाशिक
कोल्हापूर, अन्विता अमोल साळुंखे (कोल्हापूर)
42 किलो गट– तनुजा अनिल माळी (कोल्हापूर),;अक्षदा रावसाहेब झनकर नाशिक, कल्याणी रमेश नरवडे (छत्रपती संभाजी नगर), शौर्या नवनाथ कोळेकर (मुंबई)
46 किलो गट– धनश्री शिवाजी पवार (कोल्हापूर), इशिका जितेंद्र यादव (मुंबई), ओवी सचिन मुंगासे (पुणे), श्रेया जालिंदर यादव (छत्रपती संभाजीनगर)
50 किलो गट– सुहाने भाऊ चोरगे पुणे, साधना सोमनाथ चव्हाण (नाशिक), संस्कृती सचिन निचाटे (लातूर), सई सुहास पाटील (कोल्हापूर )
54 किलो गट– क्षितिजा जगदीश मरागजे (मुंबई), दिशा राजेंद्र पवार (पुणे), श्रुती गणेश थोरात (कोल्हापूर), आशा दारासिंग बैनाडे (छत्रपती संभाजीनगर)
५८ किलो गट– अंजली संतोष वेताळ (कोल्हापूर), दुर्गा राजू नाईक (लातूर), ऋतुजा गाढवे( पुणे), धृती चेतक बल कवडे (नाशिक)
62 किलो गट– शर्वरी कृष्णा राठोड
(छत्रपती संभाजी नगर), केतकी सतीश जाधव (कोल्हापूर), ईशा दादासो कोल्हटकर (लातूर)