पालम ( प्रतिनिधी ) तालुक्यातील सोशिओ इकोनॉमिक डेव्हलपमेंट ट्रस्ट केरवाडी संचलित श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय केरवाडी ही शाळा,मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा – 2 मध्ये खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा या गटातून शाळेने छत्रपती संभाजीनगर विभागातून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
सदर शाळेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा .ना.एकनाथ शिंदे साहेब , शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर, शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते शाळेतील शिक्षकांचा गौरव प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि धनादेश देऊन शाळेतील सर्व शिक्षक व संस्थापक अध्यक्ष सुर्यकांत कुलकर्णी सर यांना सन्मानित करण्यात आले. हा पारितोषिक वितरण समारंभ मुंबई येथील जमशेदजी भाभा सभागृह, एनसीपीए येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रधान सचिव आ.ए.कुंदन, शालेय शिक्षण आयुक्त सुरज मांढरे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सदर शाळेचे खास वैशिष्ट्य म्हणजे काळजी व संरक्षणाची गरज असणारे बालगृहातील 28 विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. तसेच विद्यार्थ्यांना विज्ञान हा विषय कृतियुक्त पद्धतीने हसत – खेळत शिकता यावा म्हणून संस्थेने डिस्कवरी सायन्स सेंटरची स्थापना शाळेच्या परिसरात केली आहे.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा – 2 अभियानाच्या माध्यमातून, पायाभूत सुविधा शासन अंमलबजावणी, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता,अध्ययन अध्यापनामध्ये आधुनिक तंत्राचा वापर,ग्रंथालय, शालेय अभिलेखे, विद्यार्थी अभिलेखे, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, विद्यार्थ्यांचे आरोग्य, परसबाग,महावाचन उत्सव,विद्यार्थ्यांची संगणक साक्षरता,अंगभूत कला क्रीडा गुणांचा विकास, शासकीय योजनांचा लाभ, विद्यांजली पोर्टल, स्वच्छता मॉनिटर,विविध शालेय समित्या,गावातील असाक्षर व्यक्तीची साक्षरता. अभियान या सर्व उपक्रमामध्ये शाळा अव्वल ठरली, व शाळेने विभागातून तृतीय क्रमांक पटकावला.
सदरील उपक्रमामध्ये परभणी जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी पोलास व संजय ससाने व श्रीमती आशा गरुड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या उपक्रमामध्ये शाळेने घवघवित यश संपादन केल्यामुळे संस्थेचे संस्थापक सूर्यकांत कुलकर्णी, माणिक कुलकर्णी, अजिंक्य कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, सावनी कुलकर्णी,पायल कुलकर्णी शाळेच्या सचिव सौ. गंगाताई माने, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सारंग, संस्थेचे लेखापाल प्रल्हाद पांचाळ , राम लटपटे, विष्णू जाधव यांनी शाळेतील शिक्षकांचे कौतुक केले. शाळेने या अभियानामध्ये यशाची परंपरा कायम राखली आहे .गतवर्षी शाळेने परभणी जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला होता.
हे अभियान यशस्वीरीत्या राबविण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण पौळ,सुरेखा चामले,उषा किरडे, उर्मिला कुगणे, मनोज गडमवाड,पंकज कुलकर्णी, संदीप गडगिळे,कुंडलिक जाधव,विद्या बडोले, संगीता पौळ, उर्मिला राऊत, लता गडगिळे विष्णू पांचाळ, अनिस सर, कोकाटे सर, शिनगारे सर स्वप्नभूमी परिवारातील सर्व सदस्यांनी भरपूर परिश्रम घेतले.