परभणी( प्रतिनिधी )आज दिनांक 15 मंगळवार रोजी प्रभाग क्रमांक 10 येथे विकास कामांना प्रारंभ करण्यात आला आहे .
यामध्ये काकाजी यांच्या घरापासून ते मस्के दोन्ही बाजूने पेवर ब्लॉक करणे, पोस्ट कॉलनी येथे खेडकर यांच्या घरापासून शेळके रिकामा प्लॉट पर्यंत पेव्हर रस्ता करणे तसेच चव्हाण भाभी यांच्या घरापासून सीसी रोड करणे, वैभव नगर संजय हॉटेलच्या मागच्या बाजूला ते अंभोरे यांच्या घरापर्यंत दोन्ही बाजूने पवार ब्लॉक टाकणे, सोळुंके घ्यायच्या घरापासून ते जाधव यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजू पेवर ब्लॉक टाकणे डॉक्टर धुतमल हॉस्पिटल ते डॉक्टर सांगळे हॉस्पिटल दरम्यान रस्ता करणे, सहकार नगर येथे उद्यान विकसित करणे तसेच रायगड नगर येथे उद्यान विकसित करणे आदि कामांचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी मनपाचे इंजिनियर हटकर , कारकून उमाजी जाधव , प्रभागातील नागरिक यांची उपस्थिती होती