परभणी ( प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी चळवळीमध्ये अग्रेसर असलेले व्यक्तिमत्व सिद्धार्थ पानबुडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आ.डॉ.राहुल पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेनेत जाहीर प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आ.डॉ. पाटील यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
यावेळी पानबुडे म्हणाले की, शेतकरी, कष्टकरी, मजूर, विद्यार्थी यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनत प्रवेश करत आहे. हिंदूहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे म्हणजे प्रखर, ज्वलंत विचारांची कधीही न संपणारी ऊर्जा होते. त्यामध्ये भलेभले अविचारी भस्मसात झाले. त्यांच्या विचारांची मशाल पेटवून आम्ही नव्याने क्रांती करू आणि महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून देऊ की, माणसे आपल्यातून निघून जातात परंतु त्यांचे विचार कधीच मरत नाही. आज स्व. बाळासाहेब ठाकरे आपल्यात नसले तरी त्यांचे विचार मात्र प्रत्येक शिवसैनिक, नागरीकांच्या मनामनात व घराघरात रूजलेले आहेत कोणी कितीही प्रयत्न केला तरी ते विचार पुसले जाणार नाही असे पानबुडे म्हणाले. तसेच कोणीतरी मस्ती केली म्हणे, माणसाने माणुसकी सस्ती केली म्हणे सावध व्हा रे… गहू ज्वारीच्या दाण्यांनो बुजगावण्यानेच पाखरांशी दोस्ती केली म्हणे असा टोला यावेळी बोलताना पानबुडे यांनी शिवसेना शिंदे गटाला लगावला. तसेच आ.डॉ.राहूल पाटील यांचे मागील १० वर्षातील विकासाभिमूख कामे तसेच सर्व जाती धर्मांना सोबत घेवून चालणारे नेतृत्व असल्याने आपल्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना (उबाठा) पक्षात जाहीर प्रवेश केला असल्याचे पानबुडे यांनी सांगितले.
यावेळी शहर प्रमुख ज्ञानेश्वर पवार, युवासेना शहर प्रमुख बाळराजे तळेकर, शुभम हाके, विनोद कदम, बोधिसत्व साळवे, शेख सादेक, विक्रांत जोगदंड, अभय पानबुडे, सागर पानबुडे, तेजेन्द्रसिंग बावरी, सुनील वाकळे, महेश काळे, आकाश शिंदे, शुभम माने आदींची उपस्थिती होती.
.