परभणी:(प्रतिनिधी)डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी बलिदान दिन निमित्त भाजपा परभणी महानगर कडून शहरातील हॉटेल ग्रीन लीफ जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारतीय जनसंघाचे संस्थापक काश्मीर साठी सर्वोच्च बलिदान देणारे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा बलिदान दीन निमित्त स्मृती दीन साजरा करण्यात आला.
यावेळी सर्वप्रथम डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन भाजपा प्रदेश संयोजक (डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी बलिदान दिन) महाराष्ट्र मा.श्री. चैतन्यबापू देशमुख व मा.श्री. रामरावजी केंद्रे, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, संजय शेळके, मा.नगसेवक मोकिंद खिल्लारे, प्रशांत सांगळे, मोहन कुलकर्णी, मंडळाध्यक्ष स्वप्निल पिंगळकर, मधुसूदन जोशी, दैवत लाटे, सुरज चोपडे, ऋतुजा जोशी यांनी पुष्पहार अर्पण केला व विनम्र भावे अभिवादन केले. तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी चैतन्यबापू देशमुख व रामरावजी केंद्रे यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.